ICHMH51NEWS.IN
9921600800

८ घरफोडी गुन्ह्याचा पर्दाफाश – दोन आरोपी ताब्यात, ५३ लाख ७४ हजारांचा मुद्देमाल जप्त

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

८ घरफोडी गुन्ह्याचा पर्दाफाश – दोन आरोपी ताब्यात, ५३ लाख ७४ हजारांचा मुद्देमाल जप्त


इचलकरंजी

तारदाळ, शहापूर, हातकणंगले, कुरुंदवाड आणि सांगली ग्रामीण परिसरात घरफोड्यांची मालिका राबवणारे प्रल्हाद विठ्ठल कवठेकर (वय 30, रा. संगमनगर, तारदाळ) आणि उदय श्रीकांत माने (वय 29, रा. बेघर वसाहत, पट्टाव, ता. शिरोळ) हे दोन सराईत चोरटे अखेर शहापूर पोलीसांच्या सापळ्यात अडकले आहेत. दोघांकडून ४३ तोळे ७०० मि.ग्रॅ. सोन्याचे दागिने, मोटरसायकल आणि मोबाईल असा एकूण रु. ५३,७४,०००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ज्ञानेश्वर नगर येथील फिर्यादी हरी मारुती चोपडे (४४) यांच्या घराचे कुलूप फोडून ५,७६,००० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. त्यानंतर गुप्त बातमीदार आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान दोन्ही आरोपी यड्राव परिसरात सोन्याची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळताच गुन्हे शोध पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. अंगझडतीत दागिने मिळून आल्याने त्यांची चौकशी करण्यात आली व त्यांनी सलग घरफोड्यांची कबुली दिली.

कारवाईत ४३ तोळे ७०० मि.ग्रॅ. सोन्याचे दागिने, मोटरसायकल,मोबाईल हॅण्डसेट असा एकूण ५३,७४,००० चा मुद्देमाल जप्त करण्यात आला

कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. योगेशकुमार गुप्ता, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. आण्णासाहेब जाधव व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये पोलीस निरीक्षक सचिन सुर्यवंशी, प.उ.नि. श्रीकृष्ण दरेकर यांच्यासह पोलीस अंमलदार अविनाश मुंगसे, रोहित डावळे, आयुब गडकरी, अर्जुन फातले, सतिश कुंभार, शशिकांत ढोणे व रविंद्र महाजन यांनी कारवाईत सहभाग घेतला.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर हे करीत आहेत.

कारवाईत जप्त मुद्देमाल

कारवाईची माहिती देताना जिल्हापोलिस प्रमुख योगेश कुमार गुप्ता व इतर

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा