ICHMH51NEWS.IN
9921600800

व्हॉट्सअॅप कॉलद्वारे मुंबई पोलीस असल्याचे भासवून वृद्धाची तब्बल ५४.८५ लाखाची फसवणूक

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

व्हॉट्सअॅप कॉलद्वारे मुंबई पोलीस असल्याचे भासवून वृद्धाची तब्बल ५४.८५ लाखाची फसवणूक

इचलकरंजी:
इचलकरंजी पोलीस ठाण्यात मुंबई पोलीस असल्याचे भासवून ५४.८५ लाखाची फसवणूक केल्यााप्रकरणी अज्ञात दोघांवर मोठ्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टाकवडे वेस, इचलकरंजी येथे राहणाऱ्या एका सेवानिवृत्त नागरिकाला अनोळखी व्यक्तींनी वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल करत मुंबई पोलीस असल्याचे भासवले. “तुमच्या आधार कार्डाचा वापर करून कॅनरा बँक, मुंबई येथे कोट्यवधींचे कर्ज तुमच्या नावे घेतले आहे, तुम्हाला अटक होऊ शकते,” अशी धमकी देत त्यांच्या बँक खात्याची माहिती मिळवली.दोन आठवड्यांत ५४.८५ लाख ट्रान्सफर करण्यास भाग पाडले

७ नोव्हेंबर २०२५ ते २० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत फिर्यादीच्या वेगवेगळ्या बँक खात्यांमधून आरोपींनी सांगितलेल्या खात्यांवर एकूण ५४,८५,६२४/- रुपये RTGS द्वारे पाठविण्यास भाग पाडले.

“कमिशन मिळाले आहे; प्रकरण मोठे आहे,” असा खोटा बनाव करत अनोळखी व्यक्तींनी फिर्यादीला सांगितले की या कथित कर्ज व्यवहारात त्यांना २०% कमिशन मिळाले असून या प्रकरणात भारतभर अटक होत आहेत, त्यामुळे त्यांचीही खात्री केली जात असून खाती तपासण्यासाठी पैसे विशिष्ट खात्यांमध्ये पाठवावे लागतील, असे सांगत आर्थिक फसवणूक केली.गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोसई गोविंद कोळेकर यांनी केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा