ICHMH51NEWS.IN
9921600800

मावा विक्रीवर कारवाई १९ हजाराचा मुद्देमाल जप्त

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मावा विक्रीवर कारवाई १९ हजाराचा मुद्देमाल जप्त

इचलकरंजी –
हातकणंगले तालुक्यातील कबनूर दत्तनगर येथील जयहिंदनगर गल्ली क्रमांक ७ मधील एका घरावर शिवाजीनगर पोलिसांनी कारवाई करत मोठ्या प्रमाणात सुगंधी तंबाखू, मावा व सुपारीचा साठा जप्त केला. शिवाजीनगर पोलीसात या प्रकरणात तौसीफ बाबालाल वालीकर (वय ३०, रा. जयहिंदनगर, कबनूर) याला अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पो.ना. विशाल अंगध चौगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारवाई करण्यात आली.कारवाईत पोलिसांनी अवैधरीत्या तयार केलेल्या माव्याच्या ८० पुड्या, विविध प्रकारची सुगंधी तंबाखूकातरलेली सुपारी (२५ किलो)सुगंधी तंबाखूच्या २० किलो पिशव्या, तसेच रोख रक्कम ३५० रुपये असा एकूण १९५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.पुढील तपास पो.हे.कॉ. घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा