छ. संभाजी महाराज पुतळा लोकार्पणानिमित्त आज इचलकरंजीत वाहतूक बदल
इचलकरंजी :
छत्रपती संभाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या लोकार्पन सोहळ्यानिमित्त तसेच इचलकरंजी महानगरपालिकेच्या विविध विकासकामांच्या शुभारंभासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इचलकरंजी दौऱ्यावर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि व्हीव्हीआयपी सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी विशेष वाहतूक नियोजन जाहीर केले आहे.
या आदेशानुसार छ. शाहू महाराज पुतळा, छ. संभाजी चौक, राजवाडा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या मार्गांवरील शिवतीर्थ व जनता चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून पर्यायी मार्गांवर वाहने वळविण्यात येतील. तसेच शंभुतीर्थ मार्गावरील सर्व लहान-मोठे रस्ते वाहतुकीस बंद राहणार आहेत. हा जाहिरनामा दि. १५ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत लागू राहणार आहे. नागरिकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







