शंभूतीर्थ उभारणीचे काम कौतुकास्पद-ना.शिवेंद्रसिंहराजे भोसले
इचलकरंजी:
छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळा उभारणीचे काम अत्यंत कमी कालावधीत केले हे आमदार राहुल आवाडे आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीचे कार्य कौतुकास्पद आहे. त्यांनी स्वाभिमान जागृत करणारे स्थान उभे केले आहे, असे गौरवद्गार सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी येथे काढले. शहरातील नव्याने उभारलेल्या श्री शंभूतीर्थ ठिकाणाला दिलेल्या भेटीवेळी ते बोलत होते.
शहरातील कॉ. मलाबादे चौकात उभारलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. बुधवारी मंत्री शिवेंद्रराजे भोसले इचलकरंजी येथे पक्षाच्या कार्यक्रमानिमित आले होते. यावेळी त्यांनी श्री शिवतीर्थ आणि श्री शंभूतीर्थ या दोन्ही ठिकाणी भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी ते म्हणाले, उद्घाटन सोहळ्याला आपल्याला येता आले नाही. त्यामुळे आज महाराजांचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. त्यांचे आशीर्वाद सर्वांना मिळत राहील.
यावेळी आमदार राहुल आवाडे, स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन महाजन गुरुजी, प्रसाद जाधव, पुंडलिक जाधव, संतोष सावंत, अरविंद माने, तानाजी पोवार आदींसह शिवभक्त, शंभूभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शंभूतीर्थ भेटीदरम्यान ना.शिवेंद्रसिंहराजे भोसले व पदाधिकारी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







