महाविकास आघाडीच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीस सुरवात
इचलकरंजी :
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस कार्यालयात महाविकास आघाडीच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखतीदरम्यान प्रभाग क्रमांक १ ते १० मधील एकूण १३० इच्छुक उमेदवारांची मुलाखत प्रक्रिया पूर्ण झाली.
महानगरपालिका निवडणुकीसाठी सक्षम, जनतेशी थेट संपर्क असलेले आणि विकासाभिमुख उमेदवार निश्चित करण्याच्या दृष्टीने ही मुलाखत प्रक्रिया राबविण्यात आली. मुलाखतीदरम्यान उमेदवारांचे सामाजिक कार्य, राजकीय अनुभव, प्रभागातील समस्या व पुढील विकासाबाबतचे व्हिजन जाणून घेण्यात आले.
यावेळी महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी मदन कारंडे, सागर चाळके, संजय कांबळे, प्रकाश मोरबाळे, मलकारी लवटे व सुनील बारवाडे उपस्थित होते. पुढील टप्प्यात उर्वरित प्रभागांतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
इच्छुकांच्या मुलाखती घेत असताना महाविकास आघाडीचे पदाधिकारी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







