इचलकरंजी एस.टी. स्टँडवरील सोन्या-दागिन्यांच्या चोरीचा छडा; ३.४५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत — शिवाजीनगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई.
व्हिडीओ- https://youtube.com/shorts/gqqXmvBsK0Y?si=zTgiZLUXOabW13JJ
इचलकरंजी:
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने इचलकरंजी मध्यवर्ती एस.टी. स्टँड येथे झालेल्या चोरीचा वेगाने छडा लावीत ३,४५,००० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले असून दोन संशयित महिलांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी फिर्यादी सौ. कांचन संजय कांबळे (रा. टाकवडे, ता. शिरोळ) या इचलकरंजी–पुणे बसमध्ये प्रवास करत असताना गर्दीचा फायदा घेत आरोपी महिलांनी त्यांच्या पर्समधील सोन्याचे दागिने लांबवले.या दाखल गुन्ह्याचा तपास करताना तांत्रिक माहिती व गोपनीय बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी संशयितांचा शोध घेत गीता दयानंद चौगुले (वय ५५, रा. आरीहंतनगर, आळते) आणि दिपाली आकाश लोंढे (वय २७, रा. शिरोळ) यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्हा कबूल केला असून त्यांच्या ताब्यातून संपूर्ण चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कारवाई पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रदीप जाधव, पीएसआय प्रविण साने, सहाय्यक फौजदार रावसाहेब कसेकर आणि गुन्हे शोध पथकातील अंमलदारांनी संयुक्तपणे केली. या कार्यवाहीस जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अपरा. पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव व उपविभागीय अधिकारी विक्रम गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.
दोन्ही आरोपी महिलांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याकडून देण्यात आली.
जप्त केलेल्या दागिन्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम गायकवाड,पो.नि. शिवाजीराव गायकवाड व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








