इचलकरंजी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान जनजागृती अभियान
इचलकरंजी
इचलकरंजी महानगरपालिका सार्वजनिक निवडणूक स्वीप ( SVEEP — Systematic Voters’ Education and Electoral Participation) उपक्रमाच्या माध्यमातून स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था ज्युनिअर कॉलेज येथे मतदान जनजागृती अभियान उत्साहात पार पडले.
या प्रसंगी स्वीपचे नोडल अधिकारी शंकर पवार, सहाय्यक नोडल अधिकारी सूर्यकांत शेटे, सचिन खोंद्रे, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमा उपस्थितांना मतदानाचे महत्त्व, लोकशाहीमध्ये नागरिकांची भूमिका व जबाबदारी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सर्व उपस्थितांनी लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याची व मतदान करणेची प्रतिज्ञा घेतली.
याप्रसंगी प्रा. व्ही. व्ही. भोई, प्रा.एम.डी.लगिवाले, प्रा. व्ही. पी. पाटील, प्रा. आर. बी. शिरढोणे, प्रा.प्रथमेश गवळी, प्रा. निलेश जाधव, आर. बी.जोग, स्वप्निल सूर्यवंशी यांचेसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थी व शिक्षकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हे मतदान जनजागृती अभियान अत्यंत यशस्वी व प्रेरणादायी ठरले
मतदान जनजागृती अभियान डिकेएएससी कॉलेज मध्ये राबवण्यात आले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







