ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत “परिवर्तन आघाडी”ची घोषणा, आप,वंचित,स्वाभिमानी एकत्र. पारदर्शक राजकारणाची ग्वाही

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत “परिवर्तन आघाडी”ची घोषणा, आप,वंचित,स्वाभिमानी एकत्र. पारदर्शक राजकारणाची ग्वाही

इचलकरंजी :
आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी, वंचित बहुजन आघाडी, स्वाभिमानी पक्ष तसेच समविचारी पक्षांच्या एकत्रित नेतृत्वाखाली “इचलकरंजी परिवर्तन आघाडी”ची घोषणा करण्यात आली. शहराच्या विकासासाठी कामकेंद्रित, पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त आणि लोकाभिमुख राजकारण हा या आघाडीचा प्रमुख अजेंडा असल्याचे नेत्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
आघाडीकडून शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता व नागरी सुविधा यांवर आधारित स्पष्ट कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. दर्जेदार व आधुनिक शिक्षणव्यवस्था, सर्वांसाठी सुलभ व परवडणारी आरोग्यसेवा, स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा, ट्रॅफिकमुक्त व सुरक्षित रस्ते, खड्डेमुक्त व टिकाऊ पायाभूत सुविधा तसेच नागरिकांना घरपोच सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याची हमी आघाडीने व्यक्त केली. “फक्त घोषणा नाही, काम करून दाखवणारा अजेंडा” असा नारा यावेळी देण्यात आला.
शिव शाहू विकास आघाडीकडे चर्चेतून वेळोवेळी जागा मागितल्या असतानाही त्यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्याने या निर्णयापर्यत आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
इचलकरंजी शहरातील ६५ जागा आपापल्या चिन्हावर लढवणार असून अजून समविचारी पक्षाशी चर्चा सुरू आहे त्यानाही सामावून घेणार असल्याचे प्रकाश सुतार यांनी सांगितले.
या बैठकीत आम आदमी पार्टीचे  शहराध्यक्ष वसंत कोरवी, उपाध्यक्ष यशवंत भंडारे, प्रचारप्रमुख प्रकाश सुतार, मा. उपाध्यक्ष रावसो पाटील यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष जनार्दन गायकवाड, शहराध्यक्ष अॅड. महेश कांबळे, उपाध्यक्ष राजाराम माळगे, शहर सचिव रावसाहेब निर्मळे,सलीम शेख तसेच स्वाभिमानी पक्षाचे शहराध्यक्ष हेमंत वनकुंद्रे आणि सर्व पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश सुतार, जनार्दन गायकवाड,हेमंत वनकुंद्रे

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा