जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचेकडून इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक कामकाजाचा आढावा
इचलकरंजी:
इचलकरंजी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ६ जानेवारी रोजी इचलकरंजी महानगरपालिकेस भेट देऊन निवडणूक कामकाजाचा आढावा घेतला.
या प्रसंगी जिल्हाधिकारी येडगे यांनी निवडणूक अधिकारी तथा आयुक्त पल्लवी पाटील, सर्व निवडणूक निर्णय अधिकारी आणि नियंत्रण अधिकारी यांच्याशी बैठक घेऊन निवडणुकीसंदर्भातील तयारी, यंत्रणा, मनुष्यबळ, नियोजन आणि कार्यप्रवाहाचा सविस्तर आढावा घेतला. निवडणूक प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी आवश्यक निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
तत्पश्चात त्यांनी राजीव गांधी सांस्कृतिक भवन येथे स्थापन करण्यात आलेल्या स्ट्रॉंगरूमची पाहणी केली. मतदानयंत्रांच्या सुरक्षितता, तांत्रिक बाबी आणि सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देत त्यांनी सुरक्षा आराखडा अधिक मजबूत करण्यावर भर दिला.
या पाहणी दौऱ्यावेळी अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त नंदु परळकर, उपायुक्त अशोक कुंभार, उपायुक्त राहुल मर्ढेकर, निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे, वर्षा शिंगण, माधुरी परीट, उपविभागीय अधिकारी दिपक शिंदे, पोलिस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड, शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, मुख्य लेखापरीक्षक आरती खोत, सहसंचालक (नगररचना) प्रशांत भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
आढावा घेताना जिल्हाधिकारी अमोल येडगे, आयुक्त पल्लवी पाटील
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







