जनतेला चारित्र्यवान,स्वाभिमानी राजाचे रामराज्य पाहिजे-माजी आमदार रामहरी रुपन्नावर
इचलकरंजी:
खोटी आश्वासनं, जनतेची दिशाभुल आणि सत्तेचा वापर करुन दमदाटी करणारे आता राम राज्य आणण्याची भाषा करत आहेत. जनतेलाही राम राज्य हवे आहे पण राजा श्रीरामा प्रमाणे चारित्र्यवाण, गुणवान, छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्यदेवी होळकर यांच्याप्रमाणे स्वाभिमानी हवा. त्यासाठी चांगल्या माणसांनी चांगल्या विचारांच्या उमेदवारांना चांगले काम करण्यासाठी संधी दिली पाहिजे, असे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार रामहरी रुपन्नावर यांनी सांगितले. शिव-शाहु विकास आघाडीच्यावतीने प्रभाग क्रमांक १ मध्ये झालेल्या कॉर्नर सभेत ते बोलत होते.
रुपन्नावर म्हणाले, सत्ताधारी मंडळी सत्यात उतरणार नाही, जनतेला रुचणार नाही अशी खोटी आश्वासनं देऊन जनतेला मुर्खात काढत आहेत. सत्तेचा वापर करुन रेल्वे, विमान, विमा कंपन्यांचे खाजगीकरण करुन अदानी, अंबानीच्या घशात घातली जात आहेत. निवडणुक आयोग, न्यायालय ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. जाती-पातीमध्ये भांडण लावली जात असतील तर सर्वसामान्य जनतेने करायचे काय?. सत्ता कितीही मोठी असली तरी समाजावर अन्याय होता कामा नये. यामुळे परिवर्तन घडवण्याचा मनाचा निश्चय करुन आक्रमकपणे समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. संधी पुन्ह: पुन्हा येत नाही. निवडणुकीत मतदान करण्याचा निर्णय चुकला तर ५ वर्षे जनतेला पश्चाताप करण्याची वेळ येते. त्यामुळे हुकुमशाहीकडे निघालेली व्यवस्था मोडुन काढण्यासाठी, सर्वागिण विकासाठी विचारपूर्वक मतदान करुन चांगल्या विचारांच्या उमेदवारांना निवडुन देण्याचे आवाहन केले.
प्रभाग क्रमांक १ मधील उमेदवार उदयसिंग पाटील यांनी भागात सर्व धर्मीय राहतात आणि एकोप्याने भागाचा विकास केला जात आहे. त्यामुळे जाती-पातीमध्ये भेदभाव करण्याचा कोण प्रयत्न करेल तर त्याची माझ्याशी गाठ असल्याचा इशारा दिला. सचिन राणे, रुपाली कोकणे, स्वाती लोखंडे यांनी राजकारणासाठी नव्हे तर समाजकारणासाठी, भागातील विकासासाठी निवडुन देण्याचे आवाहन केले. यावेळी नितीन कोकणे, संजय बोगार्डे, सन्मुख बोळुगीड, अंजना सोळकुडे यांनीही शिव-शाहु आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले. सभेस संतोष काळगे, रतन वाझे, रितेश बोळुगीड, अमर तोडकर, गणेश बोळुगीड, दिपक तोडकर, रोहित जानवेकर, अभिजीत सिंहासने यांच्यासह भागातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कॉर्नर सभेत बोलताना रामहरी रूपन्नावर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







