ICHMH51NEWS.IN
9921600800

एन.डी पाटील यांनी सतत प्रबोधनपरंपरेशी जोडून घेतले होते. प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

एन.डी पाटील यांनी सतत प्रबोधनपरंपरेशी जोडून घेतले होते.

प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन

इचलकरंजी:

व्यक्ती, समाज आणि राष्ट्र हा सक्षमतेचा क्रम बलिष्ठ करण्यासाठी एन.डी. आयुष्यभर झटले.त्यांनी आपले राजकीय ,सामाजिक कार्य इथल्या प्रबोधनपरंपरेशी सातत्याने जोडून घेतले होते. कोणतेही परिवर्तन लोकसंघटन व लोकप्रबोधनानेच होते यावर त्यांचा विश्वास होता.आज जे होते ते नव्हते आणि जे नव्हते ते होते असे बिंबविणारे एक भयानक अरिष्ट भवताली थैमान घालत आहे. अशावेळी एन. डी. पाटील जी भूमिका मांडत होते ती पुढें नेणे गरजेचे आहे. तीच त्यांना खरी आदरांजली ठरेल,असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सदस्य व माजी अध्यक्ष थोर विचारवंत प्राचार्य डॉ. एन.डी.पाटील यांच्या चौथ्या स्मृती कार्यक्रमात प्रबोधन वाचनालयात बोलत होते. प्रारंभी माजी नगरसेवक अजित मिणेकर यांच्या हस्ते प्रा.एन. डी. पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी पांडुरंग पिसे, सौदामिनी कुलकर्णी, संजय भस्मे, रविंद्र व्हनुगरे, अकबर नदाफ, महादेव भोसले, मनोहर जोशी,कविता डांगरे, मानसी तगारे आदी उपस्थित होते.

प्रसाद कुलकर्णी पुढे म्हणाले,महाराष्ट्रातील तमाम शेतकरी, कष्टकरी, पुरोगामी, प्रबोधन चळवळीचे अर्धशतकाहून अधिक काळ प्रा. डॉ.एन.डी.पाटील यांनी एक मुख्य नेतृत्व केले. अलीकडे राजकारणाला केवळ सत्ताकारणाचे स्वरूप आले आहे.पण एन.डी.पाटील यांच्यासारख्या नेत्याकडे नैतिक धाक आणि सत्याची कास यामुळे सत्तेला नमवण्याची मोठी ताकद होती. भारतीय प्रबोधन परंपरेतील सकारात्मकता, सृजनशीलता, भौतिकत्व,विज्ञाननिष्ठा अशी मूल्ये पुढे नेण्याचे काम त्यांनी अथकपणे केले.

एन डी पाटील यांना अभिवादन करताना प्रसाद कुलकर्णी,अजित मिनेकर,पांडुरंग पिसे,मनोहर जोशी
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा