प्रबोधिनीत लोकसत्ताक दिन साजरा
इचलकरंजी:
समाजवादी प्रबोधिनी आणि प्रबोधन वाचनालयाच्या वतीने भारतीय लोकसत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रबोधिनीचे जेष्ठ कार्यकर्ते आणि वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष पांडुरंग पिसे यांच्या हस्ते आणि चंद्रशीला अकादमीचे प्रमुख प्रा.आनंद खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पांडुरंग पिसे, प्रसाद कुलकर्णी ,आनंद खाडे, अब्दुल नदाफ ,अक्षरा मगदूम यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शकील मुल्ला, मनोहर जोशी ,शहाजी धस्ते, भीमराव नाईकवडी ,सद्दामहुसेन कारभारी ,पूजा आगम ,सतीश कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर आणि चंद्रशीला अकादमीचे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
लोकसत्ताक दिन साजरा करण्यात आला त्यावेळी उपस्थित मान्यवर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800










