श्रमसंस्कारातून व्यक्तिमत्व विकासाची शिदोरी- प्राचार्य डॉ. एस. के. खाडे.कन्या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे मौजे शिवनाकवाडी येथे उद्घाटन.
इचलकरंजी
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष संस्कार शिबिराचे उद्घाटन मौजे शिवनाकवाडी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दत्ताजीराव कदम आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य माननीय प्रो. डॉ. एस के खाडे सर उपस्थित होते. त्यांनी उपस्थित सर्व विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
महाविद्यालयीन स्तरावरील निवासी श्रमसंस्कार शिबिरातून स्वयंसेविकांना आयुष्यभराच्या व्यक्तिमत्व विकासाची शिदोरी प्राप्त होते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी विद्यामंदीर शिवनाकवाडीचे मुख्याध्यापक श्री. तुकाराम राजुगडे, न्यु हायस्कुलचे मुख्याध्यापक श्री. व्हि. के. जाधव, प्रा. व्हि. बी. पाटील यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
यावेळी अध्यक्षीय मनोगत महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्य प्रो. डॉ. त्रिशला कदम यांनी व्यक्त करताना एन. एस. एस. मधून आपल्या जीवनास योग्य दिशा प्राप्त झाल्याने शिक्षण आणि सामाजिक कार्य याचा तोल सांभाळता आला. विद्यार्थीनीना श्रम संस्कार आणि जीवनमूल्ये विकसित करण्यासाठी अशा शिबीराचा उपयोग होतो असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना आणि पाहुण्यांची ओळख कार्यक्रम अधिकारी डॉ. धीरज शिंदे यांनी केली. आभार प्रा. स्वाती हाळवणकर यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. अंकुश कुरणे यांनी केले. यावेळी प्रा. प्रियांका साळोखे, प्रा. बिना बोरगे, डॉ. सविता भोसले, कॅप्टन प्रमिला सुर्वे, तानाजी भारती, प्रदीप खोत, स्वयंसेविका, ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800









