इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने ‘२६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन’ मोठ्या उत्साहात साजरा
इचलकरंजी
सोमवार दि. २६ जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने राजाराम स्टेडियम येथे मुख्य ध्वजवंदन समारंभ महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या शुभहस्ते आणि आमदार डॉ. राहुल आवाडे, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करणेत आला.
दि. २६ जानेवारी रोजी महानगरपालिकेच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते यामध्ये शहरातील विविध शाळा – महाविद्यालयातील विद्यार्थी यांचे संचलन याचबरोबर प्राथमिक शिक्षण विभागाकडील रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन शाळा, मृगेंद्र आण्णा सुलतानपुरे विद्या मंदिर, सुभेदारकाका विद्या मंदिर या शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समुह नृत्य सादर केले.तसेच गर्ल्स हायस्कूलच्या जवळपास ६०० मुलींनी संगीतमय कवायतीचे सादरीकरण केले.सरस्वती हायस्कूलचे जितेंद्र कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनानुसार सरस्वती हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.
महानगरपालिकेच्या वाहन विभागाच्या वतीने सहा.क्रीडा अधिकारी संजय कांबळे यांच्या मार्गदर्शनानुसार ऑपरेशन सिंदुर या विषयावर आधारित प्रात्यक्षिकाचे सादरीकरण केले. यास उपस्थितांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून इचलकरंजी शहरातील विविध शाळेमधील राष्ट्रीय स्तरावर विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार करणेत आला.
आजच्या या कार्यक्रमासाठी नुतन नगरसेवक तानाजी पोवार, रवी रजपुते, सुशांत कलागते, अभिषेक वाळवेकर ,राजु पुजारी, रणजित जाधव, अनिल डाळ्या, नगरसेविका संगीता आलासे, सरीता आवळे, रुपाताई बुगड,ज्योती पाटील , पुनम माळी, शशिकला कवडे, सपना भिसे, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे, माजी नगरसेवक अजितमामा जाधव, दिलीप मुथा, महादेव गौड, दिपक ढेरे, राजु आलासे आदि मान्यवर उपस्थित होते.
त्याचबरोबर उपायुक्त नंदू परळकर, उपायुक्त अशोक कुंभार, उपायुक्त राहुल मर्ढेकर, उपायुक्त विद्या कदम, मुख्य वित्त व लेखा अधिकारी विकास खोळपे, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत, सहा. आयुक्त रोशनी गोडे सहा.आयुक्त विजय राजापुरे, आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार, कार्यकारी अभियंता अभय शिरोलीकर, मुख्याध्यापक शंकर पोवार, प्रा.शेखर शहा, संजय परिट, प्रा.संतोषी जावीर, कॅप्टन प्रमिला सुर्वे, कॅप्टन राहुल बुनांद्रे, लेफ्टनंट विनायक भोई , प्रा.रोहीत शिंगे , प्रा.ए.एस मुलानी, गणेश बरगाले, डॉ. राहुल कुलकर्णी, कृष्णा अडकिल्ला आदिंसह
शहरातील स्वातंत्र्य सैनिकांचे वारस, माजी सैनिक,नागरिक आणि शहरातील शाळा – महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ध्वजवंदन करताना आयुक्त पल्लवी पाटील,आ.राहुल आवाडे अति आयुक्त सुषमा शिंदे व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800











