इचलकरंजीत शनिवारी राष्ट्र सेविका समितीतर्फे पथसंचलनाचे आयोजन
इचलकरंजी-
मकर संक्रमण पर्वाच्या निमित्त येथील राष्ट्र सेविका समिती यांच्यावतीने सेविकांचे अनुशासित पथसंचलन शनिवार, ३१ जानेवारी रोजी दुपारी ४.३० वाजता आयोजित करण्यात आले आहे. हे पथसंचलन सौ. गंगामाई विद्यामंदिर येथील शाळेच्या प्रांगणातून सुरू होणार आहे.
पथसंचलनाचा मार्ग गंगामाई विद्यामंदिर प्रांगण येथून पोस्ट ऑफिस, बुरुड गल्ली, मोठे तळे, महात्मा गांधी पुतळा, शंभूतीर्थ, फ्रुट लाईन, व्यंकटराव हायस्कूल, मराठे मिल, सुंदर बाग मार्गे पुन्हा पोस्ट ऑफिस होत गंगामाई प्रांगण येथे समाप्त होणार आहे.
या पथसंचलनातून सेविकांकडून शिस्त, संस्कार, संघटन आणि राष्ट्रभक्तीचा संदेश दिला जाणार आहे. शिस्तबद्ध पंक्ती, एकसमान वेशभूषा आणि समर्पित वृत्ती यामुळे हे संचलन नागरिकांचे लक्ष वेधून घेणारे ठरणार आहे.
शहरातील नागरिकांनी या पथसंचलनाच्या मार्गावर मोठ्या संख्येने उपस्थित राहून सेविकांचे उत्साहवर्धन करावे, असे आवाहन राष्ट्र सेविका समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







