इचलकरंजीत आज भव्य खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन
इचलकरंजी:
चेस असोसिएशन इचलकरंजी यांच्या मान्यतेने लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी व केन बुद्धिबळ अकादमी, इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शनिवार दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी, दाते मळा, इचलकरंजी येथे संपन्न होणार आहे.
या स्पर्धेत इचलकरंजी, कोल्हापूर, सांगली तसेच कर्नाटक राज्यातील नामवंत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय रेटिंगधारक खेळाडू सहभागी होणार असून, स्थानिक खेळाडूंना उत्कृष्ट बुद्धिबळपटूंविरुद्ध खेळण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धा एकूण ७ फेरी स्विस लीग पद्धतीने खेळविण्यात येणार आहे.
खुल्या गटात प्रथम तीन क्रमांकांना रोख बक्षीस, ट्रॉफी व ऑनलाइन प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. तसेच १६ वर्षांखालील गटात प्रथम सहा क्रमांकांना रोख पारितोषिक व ऑनलाइन प्रशस्तीपत्र दिले जाणार आहेत. याशिवाय उत्कृष्ट महिला व मुलगी खेळाडू, खुल्या गटातील चौथा व पाचवा क्रमांक, ७, ९, ११ व १३ वर्ष वयोगटातील उत्कृष्ट खेळाडू, सर्वात लहान व सर्वात ज्येष्ठ खेळाडू यांना उत्तेजनार्थ रोख बक्षिसे व ऑनलाइन प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहेत. सर्वोत्तम बुद्धिबळ शाळा अथवा बुद्धिबळ अकादमीस ट्रॉफी प्रदान करण्यात येणार आहे.
स्पर्धेचे प्रमुख पंच मोहिनीराज डांगे, तर वरिष्ठ राष्ट्रीय पंच रोहित पोळ असणार आहेत. स्पर्धेसाठी प्रवेश फी २०० रुपये असून नाव नोंदणीसाठी रोहित पोळ (मो. ९६५७३३३९२६) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन स्पर्धा प्रमुख ला. कृष्णाजी भराडिया यांनी केले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







