आर्थिक वादातून चाकू हल्ला; एक जखमी, शहापूर पोलिसांत गुन्हा
इचलकरंजी:
जुन्या पैशाच्या व्यवहारातून निर्माण झालेल्या वादातून शहापूर येथे चाकू हल्ल्याची गंभीर घटना घडली. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २१ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास एम.एस.ई.बी. पॉवर हाऊसजवळ आरोपी गणेश सदलगे याने राजू कांबळे यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात कांबळे यांच्या पोटात वार झाल्याने ते जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच फिर्यादी विनोदकुमार राऊत यांच्यावरही आरोपीने धावून जात मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
२० फेब्रुवारी रोजी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपीने हा हल्ला केल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. संबंधित गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. कुटे करत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







