ICHMH51NEWS.IN
9921600800

रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लब च्या वतीने प्राध्यापक मिलिंद दांडेकर व अरुण दळवी यांचे नाट्य अनुभव सादरीकरण

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लब च्या वतीने प्राध्यापक मिलिंद दांडेकर व अरुण दळवी यांचे नाट्य अनुभव सादरीकरण

इचलकरंजी:
रोटरी सेन्ट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबोस क्लब इचलकरंजी यांच्या वतीने गुड बाय डाॅक्टर या नाटकातील काही भागाचे स-अभिनय जेष्ठ रंगकर्मी श्री अरुण दळवी व प्रा.मिलींद दांडेकर यांनी रोटरी प्रोबसच्या आयोजित केलेल्या कार्यक्रमात सादरीकरण केले, यांच्या जोडीला कथा नाट्याविष्कार सादरीकरण करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.
रंगकर्मीचे व उपस्थितांचे स्वागत सेक्रेटरी श्री किरण कटके यांनी केले तर  अध्यक्ष श्री सुनिल कोष्टी यांनी प्रास्ताविक करत असताना आपल्या क्लबच्या वतीने पुढील आठवड्यामध्ये मेडिकल कॅम्प व मार्चमध्ये कराओके गीत गाण्याचा कार्यक्रम करण्यात येणार असल्याचे सांगितले. , प्रमुख पाहुण्यांची ओळख जेष्ठ सदस्य श्री जयप्रकाश शाळगावकर यांनी करून दिली,प्रमुख उपस्थिती
 संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाशराव सातपुते यांची होती,
आयुष्यातील भुतकाळातील अधुर्‍या स्वप्नांचे शल्य आणि त्याची सदैव होणारी आठवण या भावनांना उठणारा कल्लोळ अशा संवेदनशील प्रसंगाचे नाट्याविश्काराचे अरुण दळवी-मिलिंद दांडेकर यांनी अत्यंत भावपूर्ण सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमानंतर संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाशराव सातपुते यांनी दोन्ही रंगकर्मींचे मनापासून कौतुक केले, उपस्थित सदस्यांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजेरी लावली,शिवबसु खोत, काशिनाथ जगदाळे जयप्रकाश शाळगावकर, विजय पोवार, रामचंद्र निमणकर, सदाशिव काजवे, रामदास कोळी, बापुसाहेब घुले मल्लिकार्जुन तेग्गी प्राजक्ता होगाडे आनंदी हजारे, अशोक देगावकर, जुगलकिशोर तिवारी जयश्री चौगुले माया, दिपाली कोळी शोभन स्वामी माधवी कुलकर्णी,सनतकुमार नांदणीकर,हिंमाशु मिरगे, वैभव डोंगरे प्रमोद लाटणे, जगन्नाथ पोटे, मंजुळा कांबळे, आशालता पाटील, बाबासाहेब पाटील जांभळीकर सुनंदा कांबळे, अस्मिता कांबळे, वासंती चिवटे,द्राक्षायणी लाटकर, मंगल डोंगरे,डेझी कुरणे, प्रदिप लडगे, अशोक पाटील, अनिल ज्वारे, सदाशिव मेटे, गीता लाटणे,शालीनी जगदाळे,विना श्रेष्ठी, सुरेखा खोन्द्रे, सुरेखा मगदुम, उज्वला आगरे,प्रमोदीनी देशमाने, राजश्री वाटेगावे निर्मला मोरे, ज्ञानदेव मेटे,भारती सुरपुरे,उषा बोहरा, अनिता दळवी, मनिषा कोष्टी,मधु डाळ्या, सुधा ढवळे, बाबासाहेब हावले,एम.के.कांबळे, दशरथ मोहिते, शैलजा मिरगे इत्यादी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते, आभार सह सेक्रेटरी सौ.संगिता लडगे यांनी मानले.

प्रा मिलिंद दांडेकर यांचा सत्कार करताना प्रकाश सातपुते, सुनील कोष्टी व इतर

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा