ICHMH51NEWS.IN
9921600800

डीकेटीईत ‘ग्लॅमेक्स‘ फॅशन शो उत्साहात संपन्न

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

डीकेटीईत ‘ग्लॅमेक्स‘ फॅशन शो उत्साहात संपन्न

इचलकरंजी:

 येथील डीकेटीई इन्स्टिटयूट मध्ये झालेल्या ‘ग्लॅमेक्स’ फॅशन शो च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कौशल्यपूर्ण आणि कलात्मक सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली. डीकेटीईमध्ये दरवर्षी होणारा फॅशन शो हा स्नेहसंमेलनाचा मुख्य आकर्षणबिंदू मानला जातो. विद्यार्थी कल्पकतेतून वेगवेगळया संकल्पना या कार्यक्रमात साकारतात. फॅशन शोमध्ये सहभागी झालेल्या संघानी वेगवेगळी संकल्पना घेवून विविध फॅशन वस्त्रप्रावरणे सादरीकरण केले. विविध प्रकारच्या पोशाखांमध्ये रॅम्पवर आत्मविश्‍वासाने वावरलेल्या विद्यार्थ्यानी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

संगीताच्या तालावर आणि रंगीबेरंगी प्रकाशयोजनेत सादर केलेल्या संकल्पनांनी सामाजिक, सांस्कृतिक तसेच अधुनिक विषयांचे प्रभावी दर्शन घडविले. या स्पर्धेत सर्पेट्स एलिगन्स, एलिट इलेव्हन व इजिप्शियन कल्चर या ग्रुपनी सहभाग घेतला होता तिन्ही ग्रुपनी नेत्रदीपक पारंपारिक पोशाख सादर करत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आणि परंपरेचे आकर्षक दर्शन घडविले.

सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे,कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व ट्रस्टी यांचे मागदर्शन लाभले. संस्थेच्या संचालिका प्रा.डॉ.एल.एस.आडमुठे, डे. डायरेक्टर डॉ यु.जे.पाटील, सोशल डीन प्रा.एस.जी. कानिटकर, सोशल प्रमुुख प्रा.ए.व्ही. शहा, डॉ. ए.आर. बलवान व प्रा.ए.यु. अवसरे यांच्या हस्ते फॅशन शो चे उदघाटन झाले.  डॉ.व्ही.के.ढंगे व सहकारी यांनी स्पर्धेचे संयोजन केले.

डीकेटीई मध्ये संपन्न झालेल्या ‘ग्लॅमेक्स’ या फॅशन शो मध्ये विदयार्थ्यांनी आपली कल्पकता सादर करीत असताना. 
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा