ICHMH51NEWS.IN
9921600800

रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लब, इचलकरंजी यांच्यातर्फे भव्य आरोग्य शिबिर संपन्न

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लब, इचलकरंजी यांच्यातर्फे भव्य आरोग्य शिबिर संपन्न

इचलकरंजी :
रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लब, इचलकरंजी यांच्या वतीने सर्वसमावेशक आरोग्य शिबिर उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडले. या शिबिरात विविध रक्त तपासण्या तसेच डोळ्यांची तपासणी व मोतीबिंदू तपासणी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी इचलकरंजी महानगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक श्री प्रकाश दत्तवाडे, रोटरी सेंट्रल क्लब इचलकरंजीचे अध्यक्ष श्री घनश्याम सावलानी, मार्गदर्शक डॉ. मंजुषा राक्षे व संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाश सातपुते यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या आरोग्य शिबिरात सीबीसी, केएफटी, कॅल्शियम, सिरम इलेक्ट्रोलाइट्स, एचबीए1सी, बी12, व्हिटॅमिन डी, थायरॉईड प्रोफाइल, लिपिड प्रोफाइल, आर.ए. फॅक्टर, टायफॉईड, कोअग्युलेशन टेस्ट आदी विविध रक्त तपासण्या करण्यात आल्या. एकूण १७० नागरिकांची रक्त तपासणी तर ८० जणांची डोळे तपासणी व मोतीबिंदू तपासणी करण्यात आली.
कार्यक्रमाचे स्वागत श्री किरण कटके यांनी केले, तर प्रास्ताविक अध्यक्ष श्री सुनील कोष्टी यांनी केले. यावेळी श्री प्रकाश दत्तवाडे यांच्या स्वीकृत संचालकपदी निवडीबद्दल संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाश सातपुते यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच श्री घनश्याम सावलानी, डॉ. मंजुषा राक्षे व डॉ. गणेश आळंदे यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
आभार प्रदर्शन सहसचिव सौ. संगीता लडगे यांनी केले. सूत्रसंचालन श्री किरण कटके यांनी केले.
या शिबिरास प्रोजेक्ट कमिटी सदस्य, माजी पदाधिकारी, सभासद तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. मान्यवरांनी रोटरी प्रोबस क्लबच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक करून भविष्यातही अशा आरोग्यविषयक उपक्रमांना सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.
आरोग्य शिबिराच्या शुभारंभ प्रसंगी नगरसेवक प्रकाश दत्तवाडे,प्रकाश सातपुते,सुनील कोष्टी व इतर 
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा