ICHMH51NEWS.IN
9921600800

गॅस सिलेंडर दरवाढ तात्काळ मागे घ्या; अन्यथा आंदोलन – शहर काँग्रेसचा इशारा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गॅस सिलेंडर दरवाढ तात्काळ मागे घ्या; अन्यथा आंदोलन – शहर काँग्रेसचा इशारा

इचलकरंजी :
केंद्र सरकारने घरगुती व व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरामध्ये केलेली वाढ तातडीने मागे घ्यावी, अन्यथा इचलकरंजी शहर काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देत शहर काँग्रेसने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने नुकतेच घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ६० रुपये तर व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात ११४ रुपयांची वाढ केली आहे. आधीच महागाई, बेरोजगारी आणि शेती क्षेत्रातील असंतुलित हवामानामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत गॅस दरवाढीमुळे सामान्य जनतेवर आणखी आर्थिक ताण येणार आहे.
काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनात नमूद केले की, आंतरराष्ट्रीय बाजारात किमती वाढल्या तरी पूर्वीच्या युपीए सरकारने सबसिडी देऊन जनतेवर त्याचा भार पडू दिला नव्हता. त्या काळात घरगुती गॅस सिलेंडर सुमारे ४०० रुपयांना उपलब्ध होत होता, तर सध्या त्यासाठी ९०० रुपयांपेक्षा अधिक रक्कम मोजावी लागत आहे. तसेच सिलेंडर बुकिंगचा कालावधीही १५ दिवसांवरून एक महिन्यावर नेण्यात आल्याने ग्राहकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत सुमारे १९०० रुपयांपर्यंत पोहोचल्याने हॉटेल, खानावळी व छोटे खाद्य व्यवसाय करणाऱ्यांवर मोठा परिणाम होत आहे. त्याचा थेट फटका विद्यार्थी, कामगार व नोकरदार वर्गाला बसत असून बाहेरच्या जेवणाच्या दरात वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
गॅसची टंचाई नसल्याचा सरकारचा दावा असला तरी प्रत्यक्षात सर्वसामान्य नागरिक, हॉटेल व्यावसायिक व खाद्यपदार्थ विक्रेते यांना गॅस सिलेंडर सहज उपलब्ध होत नाहीत, अशी तक्रारही करण्यात आली. त्यामुळे सरकारने दरवाढ तातडीने मागे घेऊन गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी शशांक बावचकर, नगरसेवक संजय कांबळे, बाबासाहेब कोतवाल, युवराज शिंगाडे, प्रमोद खुडे, हरून खलिफा, रविराज पाटील, सचिन साठे, अण्णा कांबळे, रवी पाटील, रवी वासुदेव, अनिल पाच्छिंद्रे, पोपट शिंदे, राशीद ढालाईत, ताजुद्दीन खतीब, सतीश कांबळे, योगेश कांबळे, राजू किणेकर, प्रशांत लोले, सुदाम साळुंखे, दिलीप भोई, प्रमोद नेजे, अरविंद धरणगुत्तीकर, रमजान शिकलगार, पवन शिंदे, प्रशांत भिवरे, आप्पा खामकर, नारायण भंडारे, विद्या भोपळे, सावित्री हजारे, शुभांगी मुसळे, लक्ष्मी नलवडे व शुभांगी बोगाडेआदी उपस्थित होते.
गॅस दरवाढी बाबत आंदोलन करताना शहर काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते
उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवेदन सादर करताना काँग्रेस पदाधिकारी 
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा