इचलकरंजीत रविवारी स्वरांजली महिला मंचचा लाईव्ह गायन कार्यक्रम
इचलकरंजी –
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्वरांजली लाईव्ह अकॅडमी आणि स्वरांजली महिला मंच यांच्यावतीने शहरातील गृहिणी व हौशी महिला गायकांसाठी विशेष लाईव्ह गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार, दि. १५ मार्च रोजी दुपारी ४ वाजता रोटरी क्लब ऑफ सेंट्रल, इचलकरंजी येथे होणार आहे.
स्वरांजली लाईव्ह अकॅडमी व स्वरांजली महिला मंच गेली तीन वर्षे गायन कलेच्या माध्यमातून अनेक नवोदित हौशी कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देत आहेत. संगीत क्षेत्रात नवोदित कलाकार घडवण्याबरोबरच संस्थेमार्फत विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमही राबवले जात आहेत. स्त्री शक्ती जागर, आई-मुलगी लेखन स्पर्धा, देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम, तसेच शास्त्रीय गायनाचे वर्ग अशा विविध उपक्रमांमधून महिलांमधील कलागुणांना प्रोत्साहन देण्याचे काम करण्यात येत आहे.
यंदा प्रथमच सर्व महिलांसाठी खास लाईव्ह म्युझिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून शहरातील अनेक महिला कलाकार यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहून महिला कलाकारांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन स्वरांजली मंचचे अध्यक्ष मुकुंद तारळेकर, उपाध्यक्ष उदय होगाडे आणि सचिव स्मिता जगताप यांनी केले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







