‘सहकार साम्राज्ञी पुरस्कार’ सोहळा ३ एप्रिलला; महिलांच्या योगदानाचा गौरव-अरुंधती महाडिक
कोल्हापूर :
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ‘सहकार साम्राज्ञी पुरस्कार’ सोहळ्याची माहिती देण्यात आली. सहकार क्षेत्रातील महिलांच्या उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती महासचिव शशिकांत राजोबा यांनी दिली.
यावेळी भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी कार्यक्रमाचे स्वरूप स्पष्ट केले. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने हा भव्य सोहळा शुक्रवार, दि. ३ एप्रिल २०२६ रोजी आनंद भवन सायबर कॉलेज सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे.
सहकार चळवळीत उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी उत्कृष्ट अध्यक्षा, उत्कृष्ट सीईओ आणि उत्कृष्ट विशेष विक्री अधिकारी अशा विविध गटांमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
याचबरोबर महिलांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात सहकार कायद्यातील बदल, व्यवसायासाठी निधी उभारणी, प्रभावी मार्केटिंग, प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणे, गुणवत्ता नियंत्रण, पॅकेजिंग व जाहिरात यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन दिले जाणार आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800










