ICHMH51NEWS.IN
9921600800

शहीद दिनानिमित्त इचलकरंजी महापालिकेकडून भगतसिंग, सुखदेव, राजगुरूंना अभिवादन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शहीद दिनानिमित्त इचलकरंजी महापालिकेकडून भगतसिंग, सुखदेव, राजगुरूंना अभिवादन

इचलकरंजी :
इचलकरंजी महानगरपालिका यांच्या वतीने शहीद दिनानिमित्त सोमवार, दि. २३ मार्च रोजी शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
भगतसिंग उद्यान येथील शहीद भगतसिंग यांच्या पुतळ्यास तसेच तिन्ही क्रांतिकारकांच्या प्रतिमांना अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी परिवहन समिती सभापती अरुणा बचाटे, माजी सहायक आयुक्त विजय राजापुरे, सहायक आयुक्त नितीन बनगे, प्रमोद बचाटे, संदीप जोशी, प्र. उद्यान पर्यवेक्षक सुनिल बेलेकर, महेश बुचडे, परशराम पोवार, दिलीप मगदूम, मनोज खंदारे तसेच उद्यान विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

शहीद दिनानिमित्त अभिवादन करताना अति आयुक्त सुषमा शिंदे व इतर

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा