आमदार राहुल आवाडे यांच्या मध्यस्थीनंतर
मजरेवाडी उपसा केंद्राचे सील काढले
इचलकरंजी
कृष्णा योजनेतून उपसा केल्या जाणाऱ्या थकीत ३० कोटी रुपयांच्या बिलासाठी सांगली पाटबंधारे विभागाने केलेले मजरेवाडी येथील कृष्णा योजना जॅकवेलचे सील आमदार राहुल आवाडे यांच्या मध्यस्थीनंतर बुधवारी काढण्यात आले. त्यामुळे निर्माण झालेला पाणी उपाश्याचा गुंता सुटला असून पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे.
कृष्णा आणि पंचगंगा या दोन नद्यांतून इचलकरंजी शहराला पिण्यासाठीचा पाणी पुरवठा केला जातो. कृष्णा योजनेच्या मजरेवाडी उपसा केंद्रातून केल्या जाणाऱ्या पाणी उपश्यापोटी थकबाकीसह सुमारे १२ कोटी २९ लाख रुपये पाटबंधारे विभागाला इचलकरंजी महानगरपालिकेकडून देणे आहे. या थकबाकीसाठी सांगली पाटबंधारे विभागाकडून थकबाकी न भरल्यास कोणत्याही क्षणी पाणी उपसा बंद करण्याचा इशाराही देण्यात आला होता. त्यानुसार मंगळवारी सायंकाळी पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता यांनी मजरेवाडी जॅकवेल सील केले होते.
या घटनेची गांभीर्याने दखल घेत आमदार राहुल आवाडे यांनी प्रथमतः प्रशासनाशी चर्चा केली. त्यानंतर सांगली पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांच्यासोबत चर्चा केली. ऐन उन्हाळ्यात निर्माण झालेल्या पाणी प्रश्नावर चर्चेमध्ये आमदार आवाडे यांनी केलेली शिष्टाई यशस्वी ठरली. आणि पाटबंधारे विभागाकडून मजरेवाडी उपसा केंद्राचे सील काढण्यात आले. आमदार आवाडे यांच्या शिष्टाईमुळे शहराचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न संपुष्टात आला आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







