ICHMH51NEWS.IN
9921600800

साडे सात चालली महापालिकेची सभा,विरोधकांकडून विविध विषयांवर कोंडी,उद्याने सामाजिक संस्थाना देणार, अधिकारी पदाधिकारी वाहने नविन घेण्याचा ठराव.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

साडे सात चालली महापालिकेची सभा,विरोधकांकडून विविध विषयांवर कोंडी,उद्याने सामाजिक संस्थाना देणार, अधिकारी पदाधिकारी वाहने नविन घेण्याचा ठराव.

इचलकरंजी
इचलकरंजी महानगरपालिकेची विविध १७ विषयांवर निर्णय घेण्यासाठी बोलवण्यात आलेली सभा तब्बल साडे सात तास चालली, विविध विषयांवर महापालिका सभेत सत्ताधाऱ्यांची व प्रशासनाची विरोधकांनी कोंडी केली.
सुरवातीला शामराव कुलकर्णी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.बार असोसिएशनला जागा मिळवून दिल्याबद्दल लोकप्रतिनिधीचे अभिनंदनाचे ठराव मांडण्यात आला.
प्रशासनाच्या कारभारावर टीका करताना विरोधकांनी काही विषयांना ४-४ मंजुऱ्या एकाच दिवसात कशा काय मिळतात तर काही विषय ४-४ वर्ष प्रलंबित असल्याबाबत धारेवर धरले,यावेळी रविंद माने कुणाच्या बाजूने बोलत आहेत हेच कळत। नसल्याचे महापौर यांनी म्हंटले,
इंदोर दौरा चांगला झाला असून त्याचा उपयोग इचलकरंजी महानगरपालिका कारभार सुधारण्यासाठी होईल असे मदन कारंडे व उदयसिंह पाटील यांनी सांगत प्रशासन व महापौरांचे अभिनंदन केले.
नगरसेवकांना दरमहा मासिक भत्ता १० हजार रुपये तर महापौर यांना आतिथ्य भत्ता वार्षिक ९०,००० उपमहापौर,सभागृह नेते,विरोधीपक्ष नेते यांना ३० हजार वार्षिक ठरवण्यात आले तर,सभा भत्ता १०० ते ४०० रुपये  देण्याचा निर्णय घेण्यात आला,खाजगी भाड्याने घेतलेली सर्व वाहनांचा करार रद्द करून नविन वाहने खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून महापालिकेची ४ वाहने उपायुक्तांना देण्यात येतील तर इतर अधिकारी वर्गास वेतनश्रेणी प्रमाणे वाहन भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला.यामुळे वार्षिक १ कोटी रुपयांची बचत होणार असल्याचे सभागृह नेते विठ्ठल चोपडे यांनी सांगितले. विविध समित्यांना कायदेशीर तरतुदीप्रमाणे  अंदाजपत्रकात तरतूद करून निधी देण्याचा तसेच मागासवर्गीय समितीसाठी ५० लाख रुपये जादा तरतूद करण्याचा ठराव करण्यात आला.सर्व प्रभाग समित्यांना समान निधी दिला जाईल असे महापौर उदय धातूंडे यांनी सांगितले. कृष्णा पाणी योजनेचा उपसा सील करण्याची वेळ येईपर्यंत प्रशासन काय करत होते असा प्रश्न मदन कारंडे व उदयसिंग पाटील यांनी विचारल्यावर प्रशासनाने दरवर्षी आपण रक्कम भरत असून पाणीपट्टी मागणी ३० कोटी असून वसुली ६ कोटी आहे,थकबाकी कृष्णेची व पंचगंगेची मिळून साडे १६ कोटी आहे पण इतर दंड वगैरे जास्त असल्याने ते रद्द करण्यासाठी आ.राहुल आवाडे प्रयत्न करत असल्याचे सांगितले.यावेळी प्रशासनाच्या निष्काळजीपणा बाबत विरोधकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.
आयुक्त पल्लवी पाटील यांनी सांगली,कोल्हापूरचाही पाणीपुरवठा सील केल्याने बंद असल्याचे सांगत नियोजनबद्ध पैसे भरत असल्याचे सांगितले. पाणीपुरवठा सील केला ही नामुष्की असून शहराची प्रतिमा मलीन करत असल्याचा आरोप  करण्यात आला.पाणीप्रश्नी निष्काळजीपणा हा प्रशासन गेंड्याच्या कातडीचे आहे का असा सवाल उदयसिंग पाटील यांनी केला.
एनडीके कंपनीच्या कार्यपद्धती वर कचरा उठावाबाबत राजू बोंद्रे, ध्रुवती दळवाई,मारुती पाथरवट,नंदकुमार पाटील यांच्यासह उपमहापौर अनिल डाळ्या यांनी जोरदार टीका करत कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी केली.
पूरपरिस्थितीत आवश्यक त्या उपाययोजना करणे,शहापूर स्मशानभुमीत सुविधा पुरवणे, गाळ काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरवण्यात आले.पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी सायझिंग उद्योगास स्लज तयार करण्यासाठी एक वर्षासाठी २ बेड कायमस्वरूपी पुरवण्याबाबत ठरवण्यात आले.बेवारस वाहने उचलताना ८ दिवस अगोदर पूर्वसूचना द्यावी त्यानंतर कारवाई करावी असे ठरवण्यात आले.रस्त्यावर बसणाऱ्या व्यापाऱ्यांना इतरत्र जागा उपलब्ध करून द्यावी त्यानंतर अतिक्रमण हटवताना तसेच प्लास्टिक बंदी कारवाई करताना कोणीही नगरसेवकांनी हस्तक्षेप करू नये अशी भूमिका महापौर उदय धातूंडे यांनी स्पष्टपणे मांडली.प्रत्येक भागात स्वच्छता नियोजन करण्यासाठी समिती स्थापन करण्याची मागणी माजी नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी मांडली.बंद स्थितीत अथवा जीर्ण झालेल्या मुताऱ्या रातोरात पाडल्या जात असल्याबाबत ध्रुवती दळवाई यांनी मुतारी डागडुजीची व महिला स्वच्छतागृहाची मागणी केली.ऑक्सिजन पार्क व उद्याने ही सोयीसुविधा करण्यासाठी सामाजिक संस्थाना दिली जातील,तेथे कोणतेही शुल्क आकारण्याचा व मालकीचा प्रश्न नसून याबाबत अटी शर्ती ठरवण्यासाठी ५ सदस्यीय समिती उपमहापौर अनिल डाळ्या यांच्या अध्यक्षतेखाली नेमली जाईल असे ठरवण्यात आले,याबाबत रुपा बुगड यांनी वृक्षगणना करण्याची मागणी केली.तर परवेझ गैबाण यांनी निर्णयाचे स्वागत केले.सागर राणे यांनी महापालिका उद्याने व ऑक्सिजन पार्क येथे गैरप्रकार चालत असल्याचे निदर्शनास आणून दिले.विजयालक्ष्मी महाजन पंतप्रधान आवास योजनेच्या अटी शिथिल करण्याची मागणी केली.महापालिका क्षेत्रात बांधकाम परवान्यांसाठी  दलालांची साखळी कार्यरत असल्याचा आरोप राजु बोंद्रे यांनी केला.
भुयारी गटार योजनेचे १४ टक्के काम झाले असून त्यास ३१ कोटी बिल दिले आहे,विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मक्तेदारास १५ कोटीं रुपये बिल घाईगडबडीने काढून देण्यामागे काय उद्देश होता तसेच संथगतीने सुरू असलेल्या कामाबाबत नाराजी व्यक्त केल्याने मक्तेदारास बोलवून कामाबाबत चर्चा करण्याचे ठरवण्यात आले.यासाठी महापालिकेचा हिस्सा १७७ कोटी असून त्याची कोणतीही तरतूद नसल्याचे स्पष्ट झाल्याने १०० कोटी रुपये कर्ज काढणार असल्याचे अभय शिरोलीकर यांनी सांगताच विरोधकांनी हल्लाबोल केला.आमदार फंडातून मारलेल्या २६० कुपनलिकांना मोटर बसवून विजकनेक्शन देण्याच्या कामाची वर्क ऑर्डर १,६४,००० प्रमाणे देण्यात आली असून यामध्ये जवळपास १ कोटी ८० लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला.
चर्चेत तानाजी पोवार,रविंद्र माने,रणजित जाधव,अमरजीत जाधव,स्मिता तेलनाडे,सुरेखा जाधव,सुशांत कलागते ल,प्रदीप धुत्रे,मनीषा नवनाळे,पुनम माळी,संगीता आलासे,अरुणा बचाटे,संतोष शेळके,तेजश्री भोसले,मोनाली मांजरे यांच्यासह नगरसेवकांनी सहभाग घेतला.
अतिक्रमण व प्लॅस्टिकबंदी बाबत महापौराची ठाम भूमिका
इचलकरंजी शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण व प्लॅस्टिक बंदी बाबत महापौर उदय धातूंडे यांनी नगरसेवकांनी हस्तक्षेप न करण्याची ठाम भूमिका घेतली.
विश्वासात घ्या,समिती व माहिती घेऊन निर्णय
बऱ्याच प्रश्नावर काय करणार याचा ठोस आराखडा नसल्याने व उपाययोजनाबाबत मतभिन्नता असल्याने सदस्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्या,समिती नेमा व माहिती घेऊन चर्चा करू असे आश्वासन महापौर उदय धातूंडे यांना द्यावे लागत होते.
सभेत बोलताना उदय धातूंडे
विरोधकांनी विविध प्रश्नावर प्रशासनाची कोंडी केली
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा