ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत गॅस पाईपलाईनला आग; आरगे भवन परिसरात घटना, १२ लाखांचे नुकसान, जिवीतहानी टळली

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत गॅस पाईपलाईनला आग; आरगे भवन परिसरात घटना, १२ लाखांचे नुकसान, जिवीतहानी टळली

इचलकरंजी :
शहरातील आरगे भवन परिसरात गॅस पाईपलाईनच्या पाईपला अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत सुमारे १२ लाख रुपयांचे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र आगीचा मोठा डोंब परिसरात पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
 काही वेळातच आगीने उग्र रूप धारण केले आणि ज्वाळा उंच उसळू लागल्या. परिसरातील नागरिकांनी तत्काळ सुरक्षित स्थळी धाव घेतली.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत तातडीने आग नियंत्रणात आणली. वेळेवर कारवाई केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. आगीमुळे पाईपलाईन व संबंधित साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.घटनास्थळी महापौर उदय धातूंडे व नगरसेविका प्रमिला जावळे,रवी जावळे यांनी भेट दिली.
दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, याबाबत पोलिसांत तक्रार देण्याचे काम सुरू आहे. संबंधित विभागाकडून घटनेचा तपास सुरू असून, गळतीचे अचूक कारण शोधले जात आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा