ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत गुरू बदलण्याचा कारणावरून घरात घुसून मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत गुरू बदलण्याचा कारणावरून घरात घुसून मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

इचलकरंजी :
कबनूर येथील फॅक्टरी रोड परिसरात तृतीय पंथी गुरू बदलणे या कारणावरून घरात घुसून मारहाण व दमदाटी केल्याची घटना घडली असून, याप्रकरणी दोघांसह दोन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी वैशाली विजय बागडी (वय ४१, व्यवसाय गृहिणी, रा. सनी कॉर्नर, बागडी गल्ली, कबनूर) यांच्या राहत्या घरी दि. ३० मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे २ वाजण्याच्या सुमारास आरोपी प्रशांत उर्फ प्रिया भरत सवाईराम, गणेश बजरंग निमिष्टे व त्यांच्या सोबत असलेल्या दोन अज्ञात इसमांनी जबरदस्तीने प्रवेश केला.
 आरोपींनी फिर्यादी व साक्षीदारांना लाथाबुक्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यानंतर आरोपींनी घरासमोर असलेल्या जर्मलच्या भांड्यांची तोडफोड केली व काठीने मारहाण करत दरवाज्याची कडी-कोयंडा तोडून सुमारे २ हजार रुपयांचे नुकसान केले.पुढील तपास कौलगे करत आहेत
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा