ICHMH51NEWS.IN
9921600800

अजिंक्य रेडेकर याला ‘सिनियर भारत श्री’ चा बहुमान

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

अजिंक्य रेडेकर याला ‘सिनियर भारत श्री’ चा बहुमान

इचलकरंजी:
शरीरसौष्ठव क्रीडा प्रकारात आपला दबदबा निर्माण केलेल्या कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा खेळाडू अजिंक्य रेडेकर याने अवघ्या महिन्याभरात चौथ्या अजिंक्यपदाचा गवसणी घातली आहे. मध्यप्रदेशातील इंदोर येथे पार पडलेल्या सिनियर भारत श्री स्पर्धेत अजिंक्य आण्णासो रेडेकर याने 85 किलो वजन गटात सुवर्णपदकासह ‘सिनियर भारत श्री’ चा बहुमान पटकविला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीचा खेळाडू असलेल्या अजिंक्य रेडेकर याने नवी मुंबई महापौर श्री, राज्यस्तरीय पुणे महापौर श्री, महाराष्ट्र श्री आणि आता सिनियर भारत श्री चा किताब मिळवत वस्त्रनगरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. इंडीयन बॉडी बिल्डिंग फेडरेशन आणि राज्य शरीर सौष्ठव संस्था मध्यप्रदेश यांच्या वतीने इंदोर येथे नुकतीच 17 वी सिनियर मेन्स अ‍ॅन्ड वुमन्स बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशीप स्पर्धा पार पडली. त्यामध्ये अजिंक्य रेडकर याने 85 किलो गटात सुवर्णपदक मिळवतानाच सिनियर भारत श्री चा बहुमान मिळविला. अजिंक्य याला प्रशिक्षक मनीष अडविलकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. एकापाठोपाठ एक स्पर्धा गाजवत आणि अजिंक्यपद मिळवत अजिंक्य याने वस्त्रनगरीच्या नांवलौकिकात भर घातल्याने सर्वच स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा