ICHMH51NEWS.IN
9921600800

डीकेटीईमध्ये सीसीडब्ल्युसी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषद दिमाखात संपन्न – जागतिक संशोधनाला नवी दिशा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

डीकेटीईमध्ये सीसीडब्ल्युसी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषद दिमाखात संपन्न – जागतिक संशोधनाला नवी दिशा

इचलकरंजी:
येथील डीकेटीईच्या टेक्स्टाईल अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित कम्प्युटींग थेरी अ‍ॅण्ड वायरलेस कम्युनिकेशन (सीसीडब्ल्युसी २०२६) या बहुप्रतिष्ठीत आंतरराष्ट्रीय परिषदेचा उत्साहपूर्ण व दिमाखदार सोहळा संपन्न झाला. इटीसी आणि कॉम्प्युटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या परिषदेत देश-विदेशातील संशोधक,प्राध्यापक,उद्योगतज्ञ व विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. सीसीडब्ल्युसी या विषयावर अधारित या परिषदेत कृत्रिम बुध्दीमता, संगणकीय तंत्रज्ञान, वायरलेस कम्युनिकेशन, नेटवर्किंग, उर्जा प्रणाली, नियंत्रण प्रणाली व रोबोटीक्स यांसरख्या अत्याधुनिक क्षेत्रांतील शोधनिबंध सादर करण्यात आले.
या परिषदेत जागतिक स्तरावरून मोठा प्रतिसाद मिळाला असून ३४८६ शोधनिबंध प्राप्त झाले होते त्यापैकी काटेकोर परिक्षण प्रक्रियेनंतर ३५६ निबंधाची निवड करण्यात आली आणि २६६ निबंध सादरीकरणासाठी नोंदणीकृत झाले. भारतातील २० राज्यांबरोबरच अमेरिका,चीन,थायलंड,इंडोनेशिया,श्रीलंका व बांग्लादेश या देशांमधून संशोधकांनी सहभाग नोंदवला.परिषदेच्या यशस्वी आयोजनामागे ३४६ देश विदेशातील तज्ञ परिक्षकांचे मोलाचे योगदान असून दोन दिवसांत ३७ तांत्रिक सत्रे हायब्रिड पध्दतीने पार पडली.

या परिषदेस प्रमुख पाहुणे म्हणून इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशनचे अध्यक्ष डॉ प्रतापसिंह देसाई उपस्थित होते उद्योजिका व दतांश एडटेक एलएलपी च्या संस्थापक चेतना सारंग, अवाया इंडिया प्रा.लि. चे समीर भोच्चे यांनी सर्व क्षेत्रांमध्ये एआय चा वाढता प्रभाव यावर किनोट स्पीकर म्हणून मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनात डॉ देसाई यांनी जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी संशोधनातील गुणवत्ता,नाविण्य आणि आंतरशाखीय दृष्टीकोन अत्यावश्यक असल्याचे अधोरेखित केले हे सांगत असताना त्यांनी अनेक उदाहरणे देवून विकसीत भारत यावर विस्तृत मार्गदर्शन केले.तर चेतना सारंग यांनी स्टार्टअप आणि नवोपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी उद्योगाभिमुख कौशल्ये विकसीत करण्याचे महत्व स्पष्ट केले.

मानद सचिव डॉ सपना आवाडे यांनी आपल्या मार्गदर्शनात आंतरराष्ट्रीय परिषदेचा उद्ेश सांगून या परिषदेमुळे सहभागींसाठी ज्ञानवर्धन, कौशल्यविकास आणि आंतरराष्ट्रीय संवादाचे प्रभावी व्यासपीठ ठरल्याचे नमूद केले. डायरेक्टर डॉ. एल.एस.आडमुठे यांनी परिषदेची माहिती देवून संस्थेचा प्रगतीचा आढावा घेतला. सदर परिषद विद्यार्थ्याना त्यांच्या शैक्षणिक दर्जा व कौशल्य विकास उंचवण्यासाठी फार महत्वाची ठरेल तसेच अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे रोजगार क्षमता वाढीसाठी हे चर्चासत्र त्यांना उपयुक्त ठरेल असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमात सदर आंतरराष्ट्रीय परिषदेचे स्मरणिकेचे प्रकाशन सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

IEEE महाराष्ट्र सेक्शनच्या तांत्रिक सहकार्याने आयोजित या परिषदेत सादर होणारे निवडक संशोधक शोधनिबंध  IEEE एक्सप्लोर या जागतिक व्यासपिठावर प्रकाशित होणार असून संशोधकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप उमटवण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे.

सदर कार्यक्रमास डीकेटीईचे कार्यकारी संचालक रवी आवाडे, चेअरमन आयसटीई महाराष्ट्र गोवा सेक्शनचे डॉ रणजीत सावंत, बुडी लोहोर विद्यापीठ इंडोनिशयाचे इन्द्रा रियांटो, डे.डायरेक्टर डॉ यु.जे.पाटील व सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. प्रा.डॉ.जयश्री खरात व डॉ.टी.आय.बागवान यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. प्रा.सुहास गोखले यांनी सुत्रसंचालन केले.

डीकेटीईच्या सीसीडब्ल्युसी परिसंवादात आंतरराष्ट्रीय परिषदेचे स्मरणिकेचे प्रकाशन करीत असताना डॉ प्रतापसिंह देसाई,चेतना सारंग,समीर भोच्चे, डॉ सपना आवाडे,रवी आवाडे,संचालिका डॉ. एल.एस.आडमुठे व मान्यवर

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा