ICHMH51NEWS.IN
9921600800

इमनपाची घरफाळा पाणीपट्टी २ दिवसात १ कोटी ११ लाखाची वसुली

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इमनपाची घरफाळा पाणीपट्टी २ दिवसात १ कोटी ११ लाखाची वसुली

इचलकरंजी
इचलकरंजी महानगरपालिकेच्या (इमनपा) घरफाळा वसुली मोहिमेत दोन दिवसांत मोठी कारवाई करण्यात आली असून नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
दि. ३० मार्च २०२६ रोजी तब्बल ५७ लाख रुपयांची वसुली करण्यात आली, तर ३१ मार्च २०२६ रोजी ५४ लाख रुपयांची वसुली करण्यात आली. थकबाकीदारांवर कठोर कारवाई करताना २ पाणी कनेक्शन कट करण्यात आले तसेच २ मिळकतींवर जप्तीची कारवाई करण्यात आली.
पथक क्रमांक १ मार्फत वॉर्ड क्रमांक ३ मधील घर क्रमांक १०५० या मिळकतीवर कारवाई करण्यात आली. संबंधित मिळकतीवर घरफाळा रु. ६०,५८४ व पाणीपट्टी रु. ७,५०० अशी थकबाकी असल्याने पाणी कनेक्शन तोडण्यात आले.
या कारवाईदरम्यान परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. महानगरपालिकेच्या या मोहिमेमुळे थकबाकीदारांमध्ये खळबळ उडाली असून वसुलीला वेग आला आहे. प्रशासनाकडून पुढील काळातही अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
मालमत्ता सील करताना पथक
घरफाळा भरण्यासाठी नागरिकांची लागलेली रांग
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा