अशोकराव स्वामी यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा
इचलकरंजी :
महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी (आण्णा) यांचा १ एप्रिल रोजी वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात अरुण विद्यामंदिर संग्राम बालवाडी येथे विद्यार्थ्यांच्या हस्ते केक कापून करण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेविका अॅड. सौ. अलका स्वामी, शकुंतला स्वामी (आऊ), माजी नगरसेवक दिलीप मुथा यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊ व भोजन वाटप करण्यात आले. तसेच सौ. अमृता स्वामी व सौ. मानसा स्वामी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना टूथपेस्ट व टूथब्रशचे वितरण करण्यात आले.
यानंतर डॉ. कार्तिक स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसेच नारायणी हॉस्पिटलच्या सहकार्याने नेत्र तपासणी शिबिर पार पडले. या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
स्टेशन रोड परिसरात जय भीम नगर ग्रुपच्या वतीने नागरिकांना सरबत वाटप करण्यात आले. हुपरी येथील व्यंकटेश सूतगिरणीत कामगारांना अल्पोपहार देण्यात आला. कोरोची येथील वात्सल्य वृद्धाश्रमासाठी किचन बांधकामाकरिता आर्थिक मदत देण्यात आली. हा उपक्रम माजी अप्पर पोलीस अधीक्षक राजेंद्र काणे व मित्रमंडळ यांच्या सहकार्याने पार पडला.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. तसेच शुभम केसरवाणी ग्रुप यांच्या वतीने कलानगर येथील गोशाळेत गायींना चारा देण्यात आला.
सर्व कार्यक्रमांचे नियोजन अशोकराव स्वामी विचारमंच व संग्राम स्वामी युवा मंच यांच्या वतीने करण्यात आले.
या प्रसंगी राहुल जानवेकर, अरुण बंडगर, संग्राम स्वामी, आकाश स्वामी, सौ. सुवर्णा स्वामी, डॉ. निकिता स्वामी, सलीम शिकलगार, महादेव स्वामी, लिंगराज कित्तुरे, दीपक स्वामी, शिव सातपुते, अविनाश वेदांते, नागेश पाटील, विश्वनाथ मेटे, उमेश देसाई, प्रकाश चौगुले, सत्यनारायण जाजू, धनराज खंडेलवाल, बाळासाहेब जांभळे, शकील शेख, शिवम केसरवाणी, उमाकांत दाभोळे, गजानन स्वामी, रावसाहेब स्वामी, अविनाश खोत, मुन्ना स्वामी, सुनील ताडे, रंजीत मेहतर, राजू सांबरे, यासीन नदाफ, मोजेस आवळे, रमेश कांबळे, संतोष स्वामी, किरण स्वामी, अमर जाधव, अशोक पाटील, राजू काळे, दिगंबर सुतार, विनायक बोंगाळे, निलेश स्वामी, अक्षय स्वामी, तेजस खाडे, विजय पाटील, सुरज स्वामी, सचिन देशमाने, सचिन मडिवाळ, बाबुराव स्वामी, प्रविण नाईक, संजय कोळी, प्रशांत गुरव, चंद्रकांत सुतार, महेश खोजगे, बाबासो मंडले, जयसिंग वडर आदींसह समस्त स्वामी मित्रमंडळ परिवार व विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक व युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सर्व उपक्रमांमधून समाजाप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित झाली असून वाढदिवस साजरा करण्याचा एक आदर्श समाजासमोर ठेवण्यात आला.
केक कापताना अरुण विद्यामंदिरच्या विद्यार्थीनी,शालेय साहित्य वितरण करताना माजी नगराध्यक्ष अलका स्वामी,माजी नगरसेवक दिलीप मुथा व कार्यकर्ते
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






