ICHMH51NEWS.IN
9921600800

अखंड नाम, जप, यज्ञ व सप्ताह सोहळा; स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

अखंड नाम, जप, यज्ञ व सप्ताह सोहळा; स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल

इचलकरंजी :
नदिवेस येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाच्या वतीने श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त अखंड नाम, जप, यज्ञ व सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ८ ते १५ एप्रिल २०२६ या कालावधीत हा धार्मिक सोहळा विविध कार्यक्रमांनी उत्साहात पार पडणार आहे.
बुधवार, ८ एप्रिल रोजी ग्रामदेवता मान-सन्मान व मंडळ मांडणीने सोहळ्याची सुरुवात होणार आहे. गुरुवार, ९ एप्रिल रोजी मंडळ स्थापना, अग्निस्थापना व देवतांचे हवन होऊन सकाळी आरतीनंतर गुरूचरित्र वाचनास प्रारंभ होईल.
यापुढील कार्यक्रमांमध्ये शुक्रवार, १० एप्रिल रोजी श्री गणेश याग व मनोबोध याग, शनिवार, ११ एप्रिल रोजी चंडी याग, रविवार, १२ एप्रिल रोजी श्री स्वामी याग, सोमवार, १३ एप्रिल रोजी गीता याग, तसेच मंगळवार, १४ एप्रिल रोजी रुद्र याग व महारुद्र याग आयोजित करण्यात आले आहेत.
बुधवार, १५ एप्रिल रोजी बली पूर्णाहुती, श्री सत्यदत्त पूजन व देवता विसर्जनाने सोहळ्याची सांगता होणार आहे. या कालावधीत त्रिकाळ आरती व अखंड नामजप सुरू राहणार असून भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सेवा केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा