ICHMH51NEWS.IN
9921600800

डीकेटीईच्या विद्यार्थ्यांचे वालचंद कॉलेज येथील स्ट्रक्चर मेकिंग स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षिस

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

डीकेटीईच्या विद्यार्थ्यांचे वालचंद कॉलेज येथील स्ट्रक्चर मेकिंग स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षिस

इचलकरंजी:
डीकेटीईच्या सिव्हील विभागातील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेवून दर्जेदार कल्पनेचे सादरीकरण करुन उल्लेखनीय यश संपादन केले आहे. वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या व्हिजन २०२६ सिम्पोझिंएम मध्ये स्ट्रक्चर मेकिंग या स्पर्धेत सहभागी डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष आव्हानात्मक स्ट्रक्चरड मॉडेल सादरीकरणातून त्यांचे अभियांत्रिकी कौशल्य आणि डिझाईनमधील कसब सादर करुन प्रथम क्रमांक पटकावत आपली गुणवत्ता सिध्द केली आहे. या स्पर्धेमध्ये राज्यातून विविध महाविद्याल्याच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
स्पर्धकांसमोर कमी वेळेत नाविण्यपूर्ण आणि मजबूत रचना साकारण्याचे आव्हान होते. अशा स्पर्धात्मक वातावरणात डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट नियोजन, अचूक गणिती मांडणी आणि तांत्रिक कौशल्य यांचा योग्य संगम साधत परिक्षकांची मने जिंकली. या यशस्वी संघात विद्यार्थी अथर्व कदम, शिवदीप राजमाने आणि हर्षद पोंक्षे यांचा समावेश होता. तिघानींही सर्जनशीलता, अभियांत्रिकी संकल्पनाचे भक्कम ज्ञान आणि उत्तम समन्वयाच्या जोरावर प्रभावी रचना सादर केली. त्यांच्या सादरीकरणात नाविण्य, स्थिरता आणि अचूकता यांचा उत्तम मिलाफ दिसून आला.
डीकेटीईच्या सिव्हील इंजिनिअरींग विभागामार्फत विद्यार्थ्यांना अशा तांत्रिक स्पर्धेमध्ये सातत्याने सहभागी होण्यासाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध करुन दिले जात आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विभागातील तज्ञ प्राध्यापकांकडून डीकेटीईच्या आयडिया लॅबच्या माध्यमातून विषेश मार्गदर्शन, सखोल प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिकांवर आधारित तयारी करुन घेतली जाते. अभ्यासाव्यतीरिक्त इंडस्ट्रीला लागणा-या नविन टेक्नॉलॉजी संदर्भात कार्यशाळा आयोजित केल्या जातात. या सर्वसमावेशक प्रयत्नांमुळे सिव्हील विभागातील विद्यार्थी तांत्रिकदृष्टया सक्षम होत असून, याआधिही  येथील विद्यार्थ्यांनी विविध राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत उल्लेखन्नीय यश संपादन केले आहे.
डीकेटीई संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाणा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ.सौ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे तसेच सर्व पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.विद्यार्थ्यांना इन्स्टिटयूटच्या संचालिका प्रा.डॉ.एल.एस.आडमुठे, उपसंचालक प्रा.डॉ.यु.जे. पाटील, विभागप्रमुख डॉ.एस.के.पाटीलयांचे मार्गदर्शन लाभले.
वालचंद कॉलेज येथील स्ट्रक्चर मेकिंग स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस स्वीकारताना डीकेटीईचे विद्यार्थी
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा