ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत यंत्रमाग उद्योजकांसाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य; सुलभ अर्ज उपलब्ध- चंद्रकांत पाटील

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत यंत्रमाग उद्योजकांसाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य; सुलभ अर्ज उपलब्ध- चंद्रकांत पाटील

इचलकरंजी:
 यंत्रमाग उद्योजकांना मिळणारी वीज सवलत सुरू ठेवण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य असल्याचा आदेश महाराष्ट्र राज्याच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाने दि. २७ ऑक्टोबर २०२५ रोजी जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर उद्योजकांना नोंदणी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन सुलभ आणि सोप्या पद्धतीचा अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे.
इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनने आमदार राहुल आवाडे यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला होता. त्यानुसार मंत्रालयात झालेल्या बैठकीनंतर उद्योजकांना सहजपणे भरता येईल असा सुधारित ऑनलाईन फॉर्म नागपूर आयुक्तालयामार्फत उपलब्ध करण्यात आला आहे.
केंद्रीय व राज्य वस्त्रोद्योग मंत्रालयाला विविध योजनांचे नियोजन, वीज दर सवलतीसाठी बजेट ठरविणे तसेच निर्यात प्रोत्साहनासाठी आवश्यक माहिती मिळावी यासाठी ऑनलाईन नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे.
पूर्वी अर्ज भरताना भाड्याचे शेड, भाड्याचे यंत्रमाग, वीज मीटर मालकी, तसेच बँक अर्थसहाय्य यांसारख्या अनेक किचकट बाबींमुळे उद्योजकांना अडचणी येत होत्या. सुधारित अर्जात या सर्व बाबी सुलभ करण्यात आल्या आहेत.
ही नोंदणी करण्याची अंतिम मुदत दि. २६ एप्रिल २०२६ आहे. २७ एच.पी. खालील व वरील सर्व यंत्रमागधारकांनी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक असून, २७ एच.पी. वरील यंत्रमागधारकांसाठी चार्टर्ड इंजिनिअरचा दाखला आवश्यक आहे. हा दाखला इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनमध्ये उपलब्ध करून दिला जाणार आहे.
नोंदणी प्रक्रियेबाबत मार्गदर्शनासाठी असोसिएशनकडून मदत केली जाणार असून, सर्व यंत्रमाग उद्योजकांनी लवकरात लवकर नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा