महात्मा जोतिबा फुले जयंतीनिमित्त इचलकरंजी मनपाकडून अभिवादन
इचलकरंजी :
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त वेताळ पेठ (गांधी कॅम्प) येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
प्र. महापौर अनिल डाळ्या यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. यावेळी स्थायी समिती सभापती सतीश मुळीक, मागासवर्गीय कल्याण समिती सभापती रुबन आवळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमास नगरसेवक राजू पुजारी, नगरसेविका धृवती दळवाई, मनिषा नवनाळे, प्रमोद बचाटे, प्रशांत नवनाळे, सदा मलाबादे यांच्यासह घनकचरा व्यवस्थापन प्रमुख धनंजय पळसुले, क्रीडा अधिकारी संजय शेटे, प्रविण बुगड, संजय कांबळे, महादेव देसाई, महेश बुचडे, मंजुनाथ खंदारे, दिलीप मगदूम आदी उपस्थित होते.
महानगरपालिकेच्या वतीने समाजसुधारक फुले यांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या विचारांचे स्मरण करण्यात आले.
अभिवादन करताना प्र.महापौर अनिल डाळ्या व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






