ICHMH51NEWS.IN
9921600800

आंबेडकर जयंतीत इचलकरंजीत गोंधळ; पोलीसावर दगडफेक, ८ जणांवर गुन्हा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आंबेडकर जयंतीत इचलकरंजीत गोंधळ; पोलीसावर दगडफेक, ८ जणांवर गुन्हा

इचलकरंजी:
 डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त स्टेशन रोडवरील पुतळा परिसरात झालेल्या गर्दीतून किरकोळ धक्काबुक्कीचे रूपांतर भांडणात झाले. या घटनेत पोलीस कर्मचाऱ्यावर दगडफेक करून जखमी केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ८ जणांसह काही अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १३ एप्रिल रोजी रात्रीपासूनच पुतळा परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दि. १४ एप्रिल रोजी मध्यरात्रीनंतर सुमारे १२.१५ वाजण्याच्या सुमारास अभिवादनासाठी मोठी गर्दी जमली होती. काही युवक नाचत असताना झालेल्या धक्काबुक्कीमुळे वातावरण तणावपूर्ण झाले आणि दोन गटांमध्ये भांडण सुरू झाले.
भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवरही हल्ला झाला. यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल सददमहुसेन सनदी यांच्या डोक्यात दगड मारून त्यांना जखमी करण्यात आले. तसेच साहील देठे, आनंदा साठे व बादल दौडमनी हेही जखमी झाले.
या प्रकरणी कृष्णा कटारे, अमोल कटारे, सिद्धार्थ विधाते, सुरज विधाते, ओंकार विधाते, साहील देठे, आनंदा साठे, बादल दौडमनी (सर्व रा. इचलकरंजी) व इतर ५ ते ६ अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपींवर शासकीय कामात अडथळा आणणे, मारहाण व दुखापत केल्याचे कलमांनुसार कारवाई करण्यात येत आहे.
घटनेनंतर पोलीसांनी तात्काळ हस्तक्षेप करून दोन्ही गटांना पांगवले असून परिसरात अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीसांकडून देण्यात आली आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा