इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ मोहिमे अंतर्गत विविध उपक्रमांचा शुभारंभ
शासन निर्देशानुसार इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ मोहिमे अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या अनुषंगाने आज शुक्रवार दि.०९ ऑगस्ट रोजी महानगर पालिकेच्या राजर्षी शाहू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची ‘ तिरंगा रॅली’ शहरातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आली.
तसेच या अंतर्गत ‘तिरंगा कॅनव्हास स्वाक्षरी’ मोहीमेचा शुभारंभ इचलकरंजी महानगर पालिका मुख्य कार्यालयाच्या प्रांगणात आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते आणि उपायुक्त प्रसाद काटकर, उपायुक्त सोमनाथ आढाव यांच्या प्रमुख उपस्थितीत करणेत आला.
याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी तिरंगा प्रतिज्ञा ग्रहण केली.
यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, मुख्य लेखापरीक्षक आरती खोत, सहा. आयुक्त विजय राजापुरे, समाज विकास अधिकारी विकास विरकर, कार्यालय अधीक्षक प्रियांका बनसोडे, सहा.कर मुल्यांकन अधिकारी अरीफा नुलकर, अग्निशमन अधिकारी सौरभ साळुंखे, महिला बालकल्याण अधिकारी सीमा धुमाळ,उद्यान पर्यवेक्षक सुनील बेलेकर, क्रीडा अधिकारी संजय शेटे यांचेसह महानगरपालिका अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







