ICHMH51NEWS.IN
9921600800

महापालिका शिक्षण समितीचे धाडसी निर्णय; प्राथमिक शाळांच्या कायापालटाला वेग

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

महापालिका शिक्षण समितीचे धाडसी निर्णय; प्राथमिक शाळांच्या कायापालटाला वेग

इचलकरंजी  :
इचलकरंजी महानगरपालिकेच्या शिक्षण समितीची पहिली सभा सभापती विद्या साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत शहरातील महापालिका प्राथमिक शाळांचा कायापालट करून त्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय एकमताने मंजूर करण्यात आले.
बैठकीत शाळांचे डिजिटलायझेशन, विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे आणि शाळा गळती रोखणे यावर विशेष भर देण्यात आला. त्यानुसार इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी बेंच उपलब्ध करून देणे, आगामी शैक्षणिक वर्षात सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व ट्रॅकसूट देणे, तसेच इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला.
शाळांचे डिजिटायझेशन करण्यासाठी शासनाकडे तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे ठरवण्यात आले असून, शाळांच्या स्वच्छतेसाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यासही मंजुरी देण्यात आली. याशिवाय, गरजेनुसार नवीन वर्ग खोल्या बांधण्याबाबतही सकारात्मक भूमिका घेण्यात आली.
या सभेत पक्षप्रतोद विठ्ठल चोपडे, योगेश पाटील, अभिषेक वाळवेकर, अमर जाधव, सौ. स्मिता तेलनाडे, सौ. ज्योती पाटील आणि नंदकुमार पाटील यांनी विविध मुद्द्यांवर आपले मत मांडून विकासकामांना पाठबळ दिले. तसेच नगरसेविका सारिका पाटील, उपायुक्त विद्या कदम, शिक्षण अधिकारी बी. एम. कासार आणि प्रशासनाधिकारी इरफान पटेल यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे स्वागत व आभार पर्यवेक्षक राजेंद्र घोडके यांनी मानले. या निर्णयांमुळे इचलकरंजीतील महापालिका शाळांचा दर्जा उंचावण्यास मदत होऊन सर्वसामान्यांच्या मुलांच्या शिक्षणाला नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

बैठकीत बोलताना राजेंद्र घोडके सर यावेळी उपस्थित सभापती विद्या साळुंखे,विठ्ठल चोपडे व इतर
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा