डाॅ. आंबेडकर पुतळा परिसर सुशाेभिकरणासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा : अविनाश कांबळे
इचलकरंजी:
घटनेचे शिल्पकार महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शहरातील स्टेशन राेडवरील पूर्णाकृती आणि जिल्हा न्यायालयासमाेरील अर्धपुतळा परिसराचे सुशाेभिकरण करण्यात यावे, त्यासाठी खास बाब म्हणून शासनाकडून 5 काेटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी नगरसेवक अविनाश गुलचंद कांबळे यांनी आमदार राहुल आवाडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तर आमदार राहुल आवाडे यांनी, पुतळा व परिसर सुशाेभिरणासाठीचा आवश्यक ताे प्रस्ताव तयार करुन घ्यावा. त्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही दिली.क
इचलकरंजीत स्टेशन राेडवर घटनाकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. तसेच गावभागाता अर्धपुतळा असून या दाेन्ही ठिकाणच्या सुशाेभिकरणाची गरज आहे. डाॅ. आंबेडकर यांचे जाती-पातीच्या भिंती ताेडून त्यांनी सर्वांसाठी केलेले कार्य सर्वांना मार्गदर्शक आहे. ताे येणाèया पिढीला समजावा त्याचबराेबर त्याचे स्मरण रहावे यासाठी आवश्यक ती उपलब्धता सुशाेभिकरणासह करुन द्यावी, असे श्री. कांबळे यांनी निवेदनात म्हटले आहे.

आ.राहुल आवाडे यांना निवेदन देताना नगरसेवक अविनाश कांबळे
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800