राष्ट्रीय प्रोसेसिंग कामगार संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर
इचलकरंजी:
राष्ट्रीय प्रोसेसिंग कामगार संघटना (इंटक) इचलकरंजीची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी शिवाजी कृष्णा भोसले, जनरल सेक्रेटरीपदी विजयालक्ष्मी अशोक कुलकर्णी तर जॉइंट सेक्रेटरीपदी राजेंद्र दत्तात्रय बचाटे यांची निवड करण्यात आली आहे.
नूतन कार्यकारिणी जाहीरप्रसंगी माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे बोलत होते. यावेळी त्यांनी दिवंगत नेते अशोक उर्फ शामराव कुलकर्णी यांच्या कार्याचा उल्लेख करत कामगार चळवळ व लढा अविरतपणे सुरू ठेवण्याचे आवाहन केले. कामगारांच्या अडीअडचणींमध्ये संघटना ठामपणे उभी राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
औद्योगिक शहर म्हणून इचलकरंजीची ओळख कायम ठेवण्यासाठी मालक व कामगार यांच्यात समन्वय आवश्यक असल्याचे सांगत सर्व प्रश्न संवादातून सोडवले जातील, असेही आवाडे यांनी स्पष्ट केले.
या वेळी अहमद मुजावर, बापूसाहेब तेरदाळे, नरसिंह पारीक यांच्यासह विविध प्रोसेसिंग युनिटमधील इंटक प्रतिनिधी उपस्थित होते. नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला.
नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :
शिवाजी कृष्णा भोसले (अध्यक्ष), प्रदीप झांजमनी साहू (उपाध्यक्ष), जयकुमार श्रीरंग कांबळे (खजिनदार), विजयालक्ष्मी अशोक कुलकर्णी (जनरल सेक्रेटरी), राजेंद्र दत्तात्रय बचाटे (जॉइंट सेक्रेटरी), दशरथ ज्ञानू मोहिते, सचिन मारुती जनवाडे, दत्तात्रय कृष्णात किल्लेदार, बाजीराव मारुती पाटील, राघवेंद्र मल्लाप्पा शरणार्थी, राहुल सदाशिव कांबळे, कुबेर आण्णा मगदूम, दिलीप कृष्णा आवळे, अमर पाटील, अंकुश वसंत भंडगे, राजेंद्र वसंत दाहात्रे, विठ्ठल राजाराम रायमाने, बापू घुले, श्रीरंग मगदूम, मंगल गणपती सुर्वे (सर्व सदस्य).
सल्लागार म्हणून माजी आमदार प्रकाश कल्लाप्पा आवाडे, प्रकाश ज्ञानबा दत्तवाडे, डॉ. गिरीष अशोक कुलकर्णी व सुनील सातगोंडा पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
नुतन कार्यकारिणी अध्यक्ष शिवाजी भोसले यांचा सन्मान करताना सर्व सदस्य
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






