ICHMH51NEWS.IN
9921600800

चंदूर येथे दगडफेक; सरकारी वाहनाचे नुकसान, पोलीस कर्मचारी जखमी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

चंदूर येथे दगडफेक; सरकारी वाहनाचे नुकसान, पोलीस कर्मचारी जखमी

इचलकरंजी (प्रतिनिधी) :
हातकणंगले तालुक्यातील चंदूर गावात बेकायदेशीर जमाव जमवून दोन गटांमध्ये झालेल्या वादातून दगडफेक झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. या घटनेत सरकारी वाहनाचे सुमारे ५ हजार रुपयांचे नुकसान झाले असून पोलीस कर्मचारी व फिर्यादी जखमी झाले आहेत.
याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा  नोंद करण्यात आला आहे.
फिर्यादी पवन दिलीप गुरव (वय ३२, रा. शिरदवाड, ता. शिरोळ) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार चंदूर येथील सिद्धार्थनगर रोडवर आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून गोंधळ घातला. यावेळी पोलीस व फिर्यादी यांनी जमावाला शांततेचे आवाहन केले असता अचानक दगडफेक सुरू झाली.
या घटनेत फिर्यादी तसेच पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद चव्हाण जखमी झाले. दगडफेकीत सरकारी वाहनाचे नुकसान झाले आहे.
या प्रकरणी प्रतिक कांबळे, समीर कांबळे, रोहित राजू कांबळे, लक्ष्मी राजू कांबळे, विशाल माने, महेश पाटील, प्रेम महादेव भोसले, अजीत रामदास पवार, राहुल उर्फ रामदास माने, ओंकार बसवराज कल्याणी यांच्यासह इतर २५-३०  जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड व इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद वायदंडे करीत आहेत.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा