इचलकरंजीत परशुराम जन्माेत्सव उत्साहात
उत्स्फूर्त जल्लाेषात लाडक्या ज्ञाती-भगीनींच्या सहभागाने शाेभायात्रा रंगली
इचलकरंजी-
इचलकरंजी ब्राह्मण सभेच्या वतीने पारंपारिक पध्दतीने परशुराम जन्माेत्सव विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने दाेन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले हाेते. धाकट्या वाड्यात इचलकरंजी ब्राह्मण सभा आणि ब्राह्मण समाजातील विविध संघटनांच्या वतीने वेदशास्त्र संपन्न ब्रह्मवृंदांच्या मंत्राेच्चारात पूजा, पवमान अभिषेक साेहळा संपन्न झाला. तर दुसऱ्या दिवशी काढण्यात आलेल्या शाेभायात्रेत समाजबांधव माेठ्या संख्येने सहभागी झाले हाेते.
जन्मोत्सवाचे औचित्य साधत ब्राह्मण सभेच्या टाकवडे वेस येथील स्व मालकीच्या जागेत नियाेजीत परशुराम भवन या वास्तुच्या नामफलकाचे अनावरण श्री दत्त विद्यामंदिर नृसिंहवाडीचे चेअरमन व शिराेळ तालुका भाजपाचे माजी अध्यक्ष मुकुंद सावकार पुजारी, उत्तुरकर, दाते यांचे उपस्थीतीत करणेत आले. सायंकाळी श्री भगवान परशुराम जन्माैत्स वाचे किर्तन साै.श्रध्दा गाेडसे यांनी सादर केले.
शाेभायात्रेची सुरुवात श्री लक्ष्मी-नृसिंह देवस्थान नरसाेबाकट्टा येथुन श्रीं ची आरती करुन व समाजातील जेष्ठ नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवुन करणेत आली. मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करत राममंदिर शाेभायात्रेची सांगता करणेत आली. रस्त्याच्या दुतर्फा सुबक रांगाेळी साकारण्यात आली हाेती. शोभायात्रेत पारंपारीक वेशभूषा, बँड पथकाचा भक्तीमय ताल, पराशुराम गीत, आवेशपुर्ण घाेषणा अशा पारंपारिक पद्धतीने भव्य दिव्य शाेभायात्रेत समाजातील लाडक्या बहिणींचा जल्लाेष वाखाण्याजाेगा हाेता. बालक- पालक, तरुण जेष्ठ नागरीकांसह ज्ञाती-बंन्धु परिवारासह सामिल झाले हाेते. यानिमित्ताने महाप्रसादाचे वाटप करणेत आले.
ब्राह्मण सभा व ब्राह्मण समाजार्ते सर्व समाजातील महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीजकङ्मा निङ्कित्ताने विविध उपक्रम राबवले जातात. हा ब्राह्मण सभेचा आदर्श सर्वांनी घ्यावा आणि ब्राह्मण समाजाची एकी व भगवान परशुरामांचा परशु हाती घेऊन कार्य करावे. छ.शिवाजी महाराज व भगवान परशुराम यांची जयंती एकत्रीत सादर करताना भक्ती- शक्तीचा संगमच झाला आहे. त्यामुळे नियाेजीत परशुराम भवन पुर्ण करणेसाठी सर्व ज्ञाती-बंन्धुभगिनींनी प्रयत्न करावेत, असे मत यावेळी समाजाच्या विविध संघटनांच्या पदाधिकाèयांसह हजर ज्ञाती-बंन्धुनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी इचलकरंजी ब्राह्मण समाजाच्या सर्व शाखांचे पदाधिकारी व महिला विभागाच्या सर्व पदाधिकाèयांचे माेलाचे सहकार्य लाभले.नियाेजीत परशुराम भवनास सढळ हस्ते समाजातील दानशुर व्यक्तीनी मदत करावी असे आवाहन या निमित्ताने करणेत आले.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800