अंगारकी संकष्टीनिमित्त पंचगंगा वरदविनायक मंदिरात विविध कार्यक्रम
इचलकरंजी :
५ मे रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री पंचगंगा वरदविनायक मंदिरात दिवसभर धार्मिक, सांस्कृतिक व समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे अभिषेक पूजेनंतर सकाळी मंगल आरती होईल, तर नंतर नित्य आरती पार पडणार आहे. भाविकांसाठी खिचडी प्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.
या निमित्ताने मंदिर भक्त मंडळ व बाळासाहेब दाते ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. तसेच संत गजानन महाराज भजनी मंडळाचा भजन कार्यक्रम रंगणार आहे. सायंकाळी अभंग, भावगीत व भक्तिगीतांचा विशेष कार्यक्रम होणार असून रात्री चंद्रोदयाच्या वेळी महाआरती होईल.
मंदिर परिसरात आकर्षक रोषणाई व रांगोळी सजावट करण्यात आली असून भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळणार आहे. या सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंदिर भक्त मंडळातर्फे करण्यात आले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






