ICHMH51NEWS.IN
9921600800

गुन्हेगारांची गय केली जाणार नाही,कायदा सुव्यवस्थेचे पालन करावे- जिल्हापोलिसप्रमुख निलोत्पल

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गुन्हेगारांची गय केली जाणार नाही,कायदा सुव्यवस्थेचे पालन करावे- जिल्हापोलिसप्रमुख निलोत्पल

इचलकरंजी
इचलकरंजी हे औद्योगिक शहर असून कायद्याचे पालन करणारे नागरिक येथे जास्त आहेत,नागरिकांनी कायदा सुव्यवस्थेचे भान राखत नियमाचे पालन करावे,कायद्याच्या चौकटीत राहून काम केल्यास पोलीस खात्यामार्फत कोणतीही अडचण येणार नसून कायदा मोडणाऱ्यांची गय केली जाणार नाही.पोलीस खात्याची प्रतिमा जनतेत उंचावणार असून जनतेच्या मनात विश्वास संपादन करून चांगले काम पोलीस प्रशासन निश्चित करेल असा विश्वास जिल्हापोलिसप्रमुख निलोत्पल यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
अमली पदार्थावर विशेष मोहिम राबवून काम करणार असल्याचे सांगत लवकरच मोठ्या कारवाया केल्या जातील असेही त्यांनी सांगितले.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव,उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड,इचलकरंजी पोलीस ठाण्याचे प्रभारी महेश चव्हाण उपस्थित होते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा