डीकेटीईस एनटीटीएम अंतर्गत १०.२१ कोटींचा प्रकल्प मंजूर; इचलकरंजीच्या टेक्निकल टेक्स्टाईल हबला गती
इचलकरंजी:
येथील डीकेटीई टेक्स्टाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटला भारत सरकारच्या वस्त्र मंत्रालयांतर्गत नॅशनल टेक्नीकल टेक्स्टाईल मिशन (NTTM) अंतर्गत टेक्निकल टेक्स्टाईल क्षेत्रातील शैक्षणिक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी ₹१०.२१ कोटींचा प्रकल्प मंजूर झाला आहे. संस्थेकडे असलेली अत्याधुनिक यंत्रसामुग्री, सातत्यपूर्ण संशोधन आणि या नव्या प्रकल्पाच्या साहाय्याने टेक्निकल टेक्स्टाईल उद्योगवाढीस मोठी चालना मिळणार आहे.
एनटीटीएम हे केंद्र सरकारचे महत्त्वाकांक्षी अभियान असून, देशात टेक्निकल टेक्स्टाईल उद्योगाचा विस्तार, कुशल मनुष्यबळ निर्मिती आणि स्वदेशी उद्योगांना प्रोत्साहन देणे हा उद्देश आहे. या अंतर्गत डीकेटीईचे एनबीए व नॅक मानांकनासह विविध निकषांवर मूल्यमापन करण्यात आले.
उपाध्यक्ष व माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी सांगितले की, हा प्रकल्प केवळ संस्थेसाठी नव्हे तर इचलकरंजीच्या औद्योगिक प्रगतीसाठी महत्त्वाचा टप्पा ठरेल. यामुळे शहराला टेक्निकल टेक्स्टाईल हब म्हणून विकसित होण्यास गती मिळून उद्योगांना नवी ऊर्जा व विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील करिअरच्या संधी उपलब्ध होतील.
प्रकल्पासाठी संचालिका प्रा. डॉ. एल.एस. आडमुठे, उपसंचालक डॉ. यू.जे. पाटील, डीन प्रा. डॉ. एस.बी. व्हनबट्टे व टेक्स्टाईल विभागाने विशेष परिश्रम घेतले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

