बालाजी चौकात तरुणावर जीवघेणा हल्ला; सात जणांविरुद्ध गुन्हा
इचलकरंजी :
बालाजी चौक येथे जुन्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करून जखमी केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाफर सादिक मकानदार (वय २२, रा. शाहापूर) यांनी फिर्याद दिली आहे.
दि. ५ मे रोजी रात्री ९ वाजता “वाद मिटवू” असे सांगून बोलावून साहील जमादार व इतर आरोपींनी बेकायदेशीर जमाव करून हर्षवर्धन रामसे याने धारदार शस्त्राने फिर्यादीच्या खांदा व मानेजवळ वार केल्याचा आरोप आहे. तसेच इतरांनी शिवीगाळ, मारहाण व धमकी दिली.
जखमी फिर्यादीवर सांगली येथील उषाकाल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी इचलकरंजी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास पोसई चव्हाण करीत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

