ICHMH51NEWS.IN
9921600800

जिल्हा न्यायालय इचलकरंजी येथे राष्ट्रीय लोकअदालत संपन्न ११३ प्रकरणे निकाली; तब्बल २ कोटी ६८ लाख रुपयांची वसुली

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्हा न्यायालय इचलकरंजी येथे राष्ट्रीय लोकअदालत संपन्न,११३ प्रकरणे निकाली; तब्बल २ कोटी ६८ लाख रुपयांची वसुली

इचलकरंजी :
 जिल्हा न्यायालय इचलकरंजी येथे शनिवार दि. ०९ मे २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दाखलपूर्व व न्यायालयात प्रलंबित अशा एकूण ११३ प्रकरणांचा तडजोडीने निकाल लावण्यात आला. या माध्यमातून तब्बल २,६८,४९,७५९ रुपयांची वसुली करण्यात आली.
मा. श्री. जी. बी. गुरव, प्रभारी अध्यक्ष, हातकणंगले तालुका विधी सेवा समिती तथा जिल्हा न्यायाधीश-१, इचलकरंजी यांच्या मार्गदर्शनाखाली ही राष्ट्रीय लोकअदालत पार पडली. लोकअदालतीमध्ये राष्ट्रीय बँका, वीज वितरण कंपनी तसेच विविध वित्तीय संस्थांची दाखलपूर्व आणि न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यामध्ये दाखलपूर्व ८ आणि न्यायालयीन प्रलंबित १०५ अशी एकूण ११३ प्रकरणे निकाली काढण्यात आली.
या लोकअदालतीसाठी एकूण सहा पॅनेल कार्यरत होती. मा. श्री. डी. एस. हातरोटे (निवृत्त जिल्हा न्यायाधीश), मा. डॉ. जी. एम. नदाफ, मा. श्रीमती आर. डी. खराटे, मा. श्रीमती ए. एम. गायकवाड, मा. श्री. ए. आर. कुलकर्णी आणि मा. श्रीमती एम. एस. गावडे यांनी पॅनेल प्रमुख म्हणून काम पाहिले.
तसेच विधीज्ञ सुधीर म्हस्के, अजय मांढरे, अनिता पी. पाटील, अनुराग कुलकर्णी, प्रिती हारगे आणि गीता सोनुले यांनी पॅनेल सदस्य म्हणून सहभाग घेतला.
लोकअदालत यशस्वी करण्यासाठी इचलकरंजी वकील संघटनेचे अध्यक्ष आर. आर. तोष्णीवाल, उपाध्यक्ष राजाराम सुतार, सचिव अभिजीत माने, सहसचिव आदित्य मुदगल, खजिनदार विजय शिंगारे यांच्यासह पदाधिकारी, सदस्य, नोटरी संघटना, विधी महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी, न्यायालयीन कर्मचारी आणि पक्षकार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

लोकअदालत प्रसंगी घेतलेले छायाचित्र
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत रवींद्र निकम व अभय भोसले अजिंक्य; दिव्या पाटील व हित बलदवा उपविजेते तर विक्रमादित्य चव्हाण व अर्णव पोर्लेकर तृतीय स्थानी

आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत रवींद्र निकम व अभय भोसले अजिंक्य; दिव्या पाटील व हित बलदवा उपविजेते तर विक्रमादित्य चव्हाण व अर्णव पोर्लेकर तृतीय स्थानी