ICHMH51NEWS.IN
9921600800

चंदूरसह इचलकरंजीत यंत्रमाग बंदला संमिश्र प्रतिसाद; आंदोलनाला हिंसक वळण

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

चंदूरसह इचलकरंजीत यंत्रमाग बंदला संमिश्र प्रतिसाद; आंदोलनाला हिंसक वळण

इचलकरंजी:
खर्चीवाल्या यंत्रमागधारकांना मजुरीवाढ मिळावी या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या यंत्रमाग बंदला शनिवारी पहिल्याच दिवशी संमिश्र प्रतिसाद मिळाला. चंदूरसह इचलकरंजीतील अनेक यंत्रमाग कारखाने बंद ठेवण्यात आले, तर काही ठिकाणी कामकाज सुरू असल्याचे दिसून आले. दुसरीकडे, वहीफणी दरवाढ स्थगितीच्या निषेधार्थ वहीफणी एजंट असोसिएशननेही कामबंद आंदोलन सुरू केल्याने यंत्रमाग उद्योगात संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे.
गुरुवारी पॉवरलूम असोसिएशनच्या सभागृहात झालेल्या यंत्रमागधारकांच्या मेळाव्यात खर्चीवाल्या यंत्रमागधारकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. २०१३ पासून ट्रेडिंग असोसिएशनकडून मजुरीवाढ मिळालेली नसल्याने यंत्रमागधारक आर्थिक अडचणीत सापडल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. अनेकांनी कारखाने विकण्याची वेळ आल्याचे सांगत संताप व्यक्त केला होता.
चंदूर परिसरातील साधे यंत्रमाग गेल्या आठवड्यापासूनच मजुरीवाढीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. मेळाव्यात चंदूरमधील यंत्रमागधारकांनी मोठा गोंधळ घालत पॉवरलूम असोसिएशनचे गेट बंद करून तातडीने बंदचा निर्णय घ्यावा, असा इशाराही दिला होता.
या पार्श्वभूमीवर पॉवरलूमचे चेअरमन चंद्रकांत पाटील यांनी सुरुवातीला दहा दिवसांची, त्यानंतर तीन दिवसांची मुदत मागितली होती. मात्र कारखानदारांनी ती भूमिका फेटाळून लावत शनिवारपासून सर्व कारखाने बंद करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार चंदूर आणि इचलकरंजी परिसरातील अनेक यंत्रमागधारक आता संघटित होत असून, मजुरीवाढ मिळाल्याशिवाय मागे हटणार नसल्याची भूमिका घेत कारखाने बंद करू लागले आहेत.
येत्या दोन दिवसांत संपूर्ण इचलकरंजीतील यंत्रमाग बंद पाडण्याचा निर्णय आंदोलनकर्त्यांनी घेतल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, वहीफणी दरात करण्यात आलेली १८ टक्के वाढ स्थगित करण्याची घोषणा मेळाव्यात करण्यात आली होती. मात्र या निर्णयाच्या निषेधार्थ शनिवारपासून वहीफणी एजंटांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. वाढीव दराने पैसे देणाऱ्या कारखानदारांचीच वहीफणी करण्यात येईल, असा निर्णय एजंट असोसिएशनने घेतल्याने उद्योगातील तणाव आणखी वाढला आहे.
दरम्यान, खर्चीवाल्या यंत्रमागधारकांच्या आंदोलनाला पहिल्याच दिवशी काही ठिकाणी हिंसक वळण लागल्याचे दिसून आले. चंदूर, कोरोची, गणेशनगर आणि तारदाळ परिसरात काही कारखानदारांनी मोटारसायकल फेऱ्या काढून यंत्रमाग बंद करण्याचे आवाहन केले. मात्र काहींनी त्यास नकार दिल्याने वादावादीचे प्रकार घडले. तसेच दोन ते तीन ठिकाणी कारखान्यांमध्ये घुसून सुताच्या बिमा कापल्याच्या घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे यंत्रमाग उद्योगातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत रवींद्र निकम व अभय भोसले अजिंक्य; दिव्या पाटील व हित बलदवा उपविजेते तर विक्रमादित्य चव्हाण व अर्णव पोर्लेकर तृतीय स्थानी

आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत रवींद्र निकम व अभय भोसले अजिंक्य; दिव्या पाटील व हित बलदवा उपविजेते तर विक्रमादित्य चव्हाण व अर्णव पोर्लेकर तृतीय स्थानी